Sadanand Shet-Tanawade: अखेर खासदारकीवर शिक्कामोर्तब; सदानंद शेट - तानावडेंची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड

अखेरच्या दिवशीपर्यंत अन्य अर्ज न आल्याने बिनविरोध निवड
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Shet-Tanawade गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी राज्यसभेसाठी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज गुरुवार दि. 13 जुलै उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीत विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सदानंद शेट - तानावडे यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली.

शेट - तानावडे यांनी अर्ज दाखल केला त्यादिवशीच विरोधी पक्षांनी गोव्यातून राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे शेट - तानावडे यांची निवड निश्चित होती.

पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. मुदत संपेपर्यंत अन्य कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने शेट - तानावडे यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले.

सामाजिक कार्याची आवड असलेले सदानंद शेट - तानावडे 1991 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी पीर्ण मधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. पण वयाची 25 वर्षे पूर्ण नसल्याने ते अपात्र झाले. पण पुढील पंचायत निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि सरपंचपदी आरूढ झाले.

Sadanand Shet Tanawade
Goa Tiger reserve: ‘एनटीसीए’च्या व्याघ्र प्रकल्प निकषामध्‍ये गोवा बसत नाही!

भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना त्यांनी बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, पक्षाचे सचिव आणि सरचिटणीस म्हणून कार्य केले. शेट - तानावडे यांनी 2002 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला.

2020 मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, विविध पोटनिवडणुकीत त्यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले.

इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपाला दमदार विजय मिळवून दिला. पक्षाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास शेट - तानावडे यांनी सार्थ करून दाखवला.

Sadanand Shet Tanawade
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे राज्यात रायबंदर येथे आरोग्य सेवा, संशोधन सुविधा; 14 जुलै रोजी होणार उद्घाटन

शेट - तानावडे यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच समवयस्क आणि वरीष्ठ नेत्यांसोबतची जवळीक यामुळे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर स्थानिक नेत्यांनी गोव्यातून राज्यसभेसाठी शेट - तानावडे यांना अधिक पसंती दिली.

अथकपणे आणि निष्ठेने पक्षाचे काम करत राहिल्याने आपल्याला हे फळ मिळाल्याचे सदानंद शेट - तानावडे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवल्यामुळे हे साध्य झाल्याचे शेट - तानावडे म्हणाले.

भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टाची आणि निष्ठेची दखल घेतली जाते. यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्याचे शेट - तानावडे म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com