केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे राज्यात रायबंदर येथे आरोग्य सेवा, संशोधन सुविधा; 14 जुलै रोजी होणार उद्घाटन

जुना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुविधा सुरु
Ministry of Ayush
Ministry of Ayush Dainik Gomantak
Published on
Updated on

Central Ayush Ministry: केंद्रीय आयुष मंत्रालयाने गोव्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि संशोधन सुविधा स्थापन केली आहे. ही सुविधा रायबंदर येथील जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आली आहे.

या नवीन सुविधेचे उद्घाटन 14 जुलै 2023 रोजी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याहस्ते होणार आहे. सोनोवाल हे बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग खात्याचेही मंत्री आहेत.

याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह गोवा सरकारमधील तसेच आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhyan Foundation Goa Case
Colvale Central Jail Wine Allegations
DA Hike Latest Update
DA Hike for Central Government Employees
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com