Goa Recruitment: जीपीएससी भरती होणार ऑनलाईन; गैरप्रकारांना बसणार आळा, एकाच डिजिटल व्यासपीठावरून भरती

Infotech Corporation Of Goa GPSC Tender: राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
Infotech Corporation Of Goa GPSC Tender
Goa RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड (आयटीजी) यांनी गोवा लोकसेवा आयोगासाठी (जीपीएससी) थेट भरती व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

या नव्या प्रणालीमुळे सरकारी नोकरीसाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावरून हाताळली जाणार आहे. प्रस्तावित थेट भरती व्यवस्थापन प्रणालीमुळे विविध शासकीय विभागांकडून भरतीसाठी मागणी पाठविण्यापासून ते अंतिम उमेदवारांच्या शिफारशीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत होणार आहे.

Infotech Corporation Of Goa GPSC Tender
Online Gambling Bust: बाणावलीत ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश, कोलवा पोलिसांचा सापळा रचून छापा, 2.60 लाख रुपयांच्या मुद्देमालासह तिघे गजाआड

भरती जाहिराती प्रसिद्ध करणे, उमेदवारांची नोंदणी, अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी, लेखी परीक्षा, मुलाखती, गुणवत्ता यादी तयार करणे, शिफारस प्रक्रिया तसेच तक्रार निवारण यांसारख्या सर्व टप्प्यांचे व्यवस्थापन या प्रणालीद्वारे केले जाईल.या प्रणालीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

अर्ज शुल्क भरण्यासाठी सुरक्षित देयक प्रणाली जोडली जाणार असून अर्ज प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती उमेदवारांना संदेश व ई-मेलद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Infotech Corporation Of Goa GPSC Tender
Goa Online Fraud: मोबाईलवरची 'ती' एक चूक अन् 74 लाख गायब! सायबर भामट्यांनी गोव्यात दोघांना घातला गंडा; फोनने केला गेम

प्रत्येक प्रक्रियेची होणार स्वतंत्र नोंद

प्रत्येक प्रक्रियेची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असून कोणत्या अधिकाऱ्याने कोणती कारवाई केली याचा तपशील उपलब्ध राहील. जबाबदारी निश्चित करणे आणि पडताळणी करणे सोपे होणार आहे. उमेदवार आणि आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी अनुप्रयोगही विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे भरती प्रक्रियेची माहिती, अर्जाची स्थिती, परीक्षा व मुलाखतींची वेळापत्रके, सूचना आणि निकाल सहजपणे उपलब्ध होतील.

बारा आठवड्यांत प्रणाली कार्यान्वित

भरती प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून निविदेतील अटींनुसार कामाचा आदेश दिल्यानंतर अवघ्या बारा आठवड्यांत ही प्रणाली विकसित करून कार्यान्वित करणे अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगाची भरती प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होईल आणि सुलभ, वेगवान व विश्वासार्ह सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com