Goa Accident: भाच्याला घरी सोडताना मामावर काळाचा घाला; शिवोलीत रेंट-अ-थारचा थरार, स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू

sanket dabholkar siolim accident: फर्नांडिसवाडा-शिवोली येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील थार जीपचालकाने दुचाकीचालकाला निर्दयीपणे चिरडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: फर्नांडिसवाडा-शिवोली येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील थार जीपचालकाने दुचाकीचालकाला निर्दयीपणे चिरडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. घरातील कर्ता पुरुष संकेत दाभोलकर (वय ३२ वर्षे) याच्यावर क्रूर काळाने घाला घातल्याने हे कुटुंब निराधार बनले आहे.

सुट्टीच्या निमित्ताने मामा संकेतच्या घरी आलेला भाचा निश्चल मोरजकर (वय १० वर्षे) याला घरी सोडण्यासाठी संकेत सकाळी डिओ दुचाकीवरून निघाला असता, फर्नांडिसवाडा येथे समोरून भरवेगाने आलेल्या थार जीपने दोघांनाही चिरडले. ही धडक इतकी भयानक होती, की जीपचे पुढचे चाक निखळून रस्त्यातच पडले आणि समोरच्या कुंपणाला धडक देत गाडी स्थिरावली. जीपखाली आल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला, तर निश्चलचा उजवा पाय गाडीतच अडकल्याने तो जायबंदी झाला.

Goa Accident
Goa Dam Water Level: राज्यातील चार धरणांमधील पाणीसाठा 35 टक्‍क्‍यांखाली, मान्‍सूनपूर्व पाऊसही मंदावला; शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

अपघाताची माहिती मिळताच शिवोली आऊट पोस्टचे पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संकेत आणि निश्चलला उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी संकेतला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जीपचालक यदु कृष्ण कुमार (मूळ केरळ) याला हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दांडा-शिवोली येथील संकेत हा अविवाहित होता; परंतु घरातील कर्ता पुरुष असल्याने वयोवृद्ध आई-वडील आणि एक लहान भाऊ यांची जबाबदारी त्याच्यावरच होती. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. त्याच्या अकाली मृत्युमुळे दाभोलकर कुटुंबीयांवर संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. संकेतच्या अपघाती निधनामुळे दांडा -शिवोली परिसरातून तीव्र संताप अन हळहळ व्यक्त केली जात आहे.

होतकरू तरुण संकेत याचा शुक्रवारी रेंट अ कारच्या अपघातात हकनाक बळी गेला. दुचाकीवर मागे बसलेला दहा वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला असला तरी गंभीर अवस्थेत मृत्युशी झुंज देत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. - - महेश्वर गोवेकर, जि.पंच. सदस्य, शिवोली.

Goa Accident
Goa Sand Mining: रेती उत्खननासाठी योग्य तोडगा काढा, प्रश्‍‍न पंतप्रधानांच्या दरबारी; 'सीआरझेड' नियमांमुळे उत्खनन ठप्प

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रेंट अ कार अपघातांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भाडोत्री गाड्यांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. असे अपघात रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

- दिलायला लोबो, आमदार, शिवोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com