Ro-Ro Ferryboat in Goa: "आम्हाला रो-रो फेरी हवीच आहे!" फेरी बंद करण्याला प्रेमेंद्र शेट यांचा 'नो' सिग्नल

Goa ferry Service News: आमदार प्रेमेंद्र शेट यांनी रो-रो फेरीच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडली आहे.
Goa River Transport
Goa River TransportDainik Gomantak
Published on
Updated on

Ro-Ro Boat Goa: गोव्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राज्याच्या रो-रो फेरी सेवेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद समोर आले आहेत. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रो-रो फेरीच्या दुरवस्थेचा व्हायरल व्हिडिओ बनवणाऱ्यांवर टीका केली होती. यावर आता आमदार प्रेमेंद्र शेट यांनी रो-रो फेरीच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडली आहे.

आमदार प्रेमेंद्र शेट यांचा रो-रो फेरीला पाठिंबा

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले आहे की, "रो-रो फेरी सेवा बंद करण्यासाठी आम्ही कोणतेही निवेदन देणार नाही." उलट, त्यांना रो-रो फेरी हवी असल्याचे त्यांनी सांगितले. "ही फेरी लोकांच्या मागणीमुळेच आणली गेली आहे. प्रत्येकाला ती हवी आहे, फक्त काही लोकं या मुद्द्याला विनाकारण खेचण्याचा प्रयत्न करत आहेत," असे शेट म्हणाले.

भाड्याच्या दरात सवलतीची मागणी

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्हायरल व्हिडिओ बनवणाऱ्यांवर टीका करत, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदन दिल्यास फेरी सेवा बंद करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आमदार शेट यांनी या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली. त्यांनी सरकारला केवळ भाड्याच्या दरात सवलत देण्याची विनंती केली आहे, तीही फक्त आवश्यक असलेल्या ठिकाणी. यात शाळेत जाणाऱ्या मुलांची वाहने, चोडणमधील टॅक्सी चालक किंवा लहान वस्तू आणि मालवाहू वाहनांचा समावेश असावा, अशी त्यांची मागणी आहे.

Goa River Transport
Ro-Ro Ferry in Goa: "रो-रो फेरी बंद करू, लेखी स्वरूपात सांगा" व्हायरल व्हिडिओवर मंत्री फळदेसाई संतापले

मंत्री फळदेसाई यांचा पूर्वीचा पवित्रा

याआधी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी, चोडण ते रायबंदर मार्गावरील रो-रो फेरीच्या स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेचा व्हायरल व्हिडिओ 'मुद्दामून' बनवला गेल्याचा आरोप केला होता. हा प्रकल्प २५ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेला नसून, तो करार पद्धतीने तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. करारात काही त्रुटी आढळल्यास सरकार तो करार रद्द करू शकते, असेही त्यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com