Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

Viresh Borkar warns Ajay Kholkar: ‘‘पक्षातून निलंबित केलेले असतानाही अजय खोलकर अजूनही रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सला (आरजी) हानी पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न करीत आहेत.
Viresh Borkar warns Ajay Kholkar
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘पक्षातून निलंबित केलेले असतानाही अजय खोलकर अजूनही रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सला (आरजी) हानी पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या माध्‍यमातून भाजपच हे घडवून आणत आहे. त्‍यामुळे यापुढे खोलकर यांनी अशी कृत्‍ये केल्‍यास गप्‍प बसणार नाही. त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’’, असा इशारा आरजीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेश बोरकर यांनी रविवारी दिला.

विधानसभा निवडणूक अवघ्‍या चार महिन्‍यांवर येऊन ठेपलेली असतानाच, आरजीतील अंतर्गत वाद पुन्‍हा वाढण्‍यास सुरुवात झालेली आहे. ‘‘आमदार वीरेश बोरकर यांना पक्षातून निलंबित केलेले असतानाही ते पक्ष आणि चिन्‍हाचा गैरवापर करीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे’’, असे म्‍हणत अजय खोलकर यांनी पक्ष अजूनही आपल्‍याच ताब्‍यात असल्‍याचे आणि आपणच पक्षाचे खजिनदार असल्‍याचे शनिवारी स्‍पष्‍ट केले होते.

Viresh Borkar warns Ajay Kholkar
FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

याबाबत बोलताना, ‘‘अजय खोलकर यांनाच आपण पक्षातून निलंबित केलेले आहे. तरीही ते पक्षाच्‍या नावाचा गैरवापर करीत आहेत. पक्ष वाढीसाठी काहीही काम न करता केवळ सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून स्‍वत:ला हवी तशी वक्तव्‍ये करीत आहेत. आरजी काँग्रेससोबत आघाडीत जाणार असल्‍याने पक्षाला हानी पोहोचवण्‍यासाठी भाजप खोलकरांचा वापर करून घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com