फातोर्डा: जेव्हा कोविड महामारीमुळे (Covid Pandemic) गोव्यासह (Goa) मडगावात (Margao) कलाम 144 लागला होता. (Section 144) त्यामुळे कडक लॉकडाऊन (Lock down) जाहीर करण्यात आले होते. तेव्हा मडगावचे सर्व रस्ते ओसाड पडले होते. कोविड संकट (Covid crisis) जसजसे कमी होऊ लागले आहे तसतसे आता सरकारने (Goa govt.) नियम शिथिल केल्याने मडगाव शहरातील वाहतुक पुर्वपदावर तर आली आहे, परंतु त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी (Traffic jam) देखील मडगावच्या रस्त्यांवर होताना दिसत आहे.
मडगाव नगरपालिकेच्या गार्डन सभोवतालचे रस्ते, वर्दे वालावलीकर रस्ता, बॅंक ऑफ इंडिया ते पुर्वीचा रेल्वे गेट रस्ता, आके ते मडगाव, बोर्डा ते मडगाव तसेच पोलिस स्थानकाजवळील सेंट्रल बॅंकेसमोरील रास्ता व पोप्यलर हायस्कुल ते श्री दामोदर विद्याभुवन सभागृह, लॉयला हायस्कुल ते विर्जिनकर हाऊस या सदर रस्त्यांवर सकाळ ते संध्याकाळ पर्यंत कायमची वाहतुक होत असते. मात्र या सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच वाहने पार्क करुन ठेवली जातात. शिवाय जेथे जेथे नो पार्किंग झोन्स आहेत, तेथे सुध्दा वाहने पार्क केल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते.
सद्यस्थितीच अशी असेल तर एकदा का शाळा सुरु झाल्या की मग वाहतुक कोंडीचा गुंता सोडवणे कठीणच होणार आहे.सांगायचे झाल्यास या सर्व ठिकाणी एकूण पाच शाळा, दोन उच्चमाध्यमिक शाळा व एक महाविद्यालयाचा समावेश आहे. शिवाय या ठिकाणी कधीच वाहतुक नियंत्रण पोलिस तैनात केले जात नाहीत.सादर समस्येविषयी पोलिस अधिकाऱ्यांना विचारले तर आमच्याकडे पुरेशी वाहतुक नियंत्रण पोलिसांची व्यवस्था नसल्याचे कारण पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात येते. त्यामळे अश्याप्रकारे होणाऱ्या वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदार, तसेच वाहतुक नियंत्रण खात्याचे अधिकारी व पोलिस अधिकारी आणि नगरपालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन सदर समस्येवर तोडगा काढणे अतिशय आवश्यक असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.