Goa Weather: असह्य उष्म्याने नागरिक हैराण; किमान तापमानाचाही उच्चांक, पारा 36 अंशांवर; मान्सूनपूर्व पावसाअभावाचाही परिणाम

Goa Record MinimumTemperature: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून असह्य उष्म्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Goa Record MinimumTemperature
Goa Record MinimumTemperatureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून असह्य उष्म्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून केवळ कमाल तापमानातच नव्हे, तर किमान तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी यंदातील सर्वाधिक किमान तापमान २८.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा तब्बल २.३ अंशांनी अधिक आहे. कमाल तापमानही ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून ते सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक नोंदविण्यात आले आहे.

आर्द्रता ८३ टक्क्यांवर

बुधवारी आर्द्रता ८३ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. वाढत्या उष्म्यामुळे घराबाहेर पडणे कठीण होत असून रात्रीच्या वेळीही उकाड्याचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत आहे. पंखा किंवा वातानुकूलित यंत्रणेशिवाय राहणे कठीण बनले आहे. पुढील चार ते पाच दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३६ अंश, तर किमान तापमान २८ अंशांपर्यंत राहू शकते, असा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Goa Record MinimumTemperature
Goa Temperature: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढला; येत्या दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

उष्मा अधिक का जाणवतोय?

  • गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी वाढत्या तापमानाबाबत पुढील कारणे स्पष्ट केली १ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानात अधिक वाढ होत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे या काळात अपेक्षित प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही.

२ रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत असून आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीही असह्य उष्मा जाणवत आहे.

३. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यामुळे त्या काळात कमाल तापमान साधारण ३५ अंशांपर्यंत मर्यादित राहिले होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.

४. मागील दोन-तीन वर्षांची तापमानाची आकडेवारी पाहिल्यास किमान तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com