Rajvardhan Yadav: गोव्याचा राजवर्धन यादव बनला फायटर पायलट; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मिळविले 'प्रेसिडेंट्स कमिशन'

Rajvardhan Yadav Fighter Pilot: येथील आकाशवाणी केंद्रातील श्रोता अनुसंधान अधिकारी दिनकर यादव यांचे सुपुत्र राजवर्धन यादव यांनी फायटर पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ‘विंग्ज’ आणि ‘ब्रेव्हेट्स’ प्राप्त केले.
 Rajvardhan Yadav Fighter Pilot
Rajvardhan YadavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येथील आकाशवाणी केंद्रातील श्रोता अनुसंधान अधिकारी दिनकर यादव यांचे सुपुत्र राजवर्धन यादव यांनी फायटर पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ‘विंग्ज’ आणि ‘ब्रेव्हेट्स’ प्राप्त केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २१७ व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले आणि उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ‘प्रेसिडेंट्स कमिशन’ प्रदान केले.

नॅशनल डिफेन्स अकादमीमधील महिलांच्या पहिल्या तुकडीसह हैदराबादमधील डुंडीगल येथील हवाई दल अकादमीमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकूण २३१ फ्लाईट कॅडेट्सना (१९४ पुरुष व ३७ महिला) १३ जून रोजी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून नियुक्त केले. यात राजवर्धन यादव यांचा समावेश आहे.

 Rajvardhan Yadav Fighter Pilot
Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

राजवर्धन यांनी शालेय शिक्षण पीएम श्री केंद्रीय विद्यालय, आयएनएस मांडवी नौदल तळ, वेरे येथून पूर्ण केले आणि गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फर्मागुडी येथून बी.ई. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील ‘एएफसीएटी’ स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली व एअर फोर्स अकादमी, डुंडीगल, हैदराबाद येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com