Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Niger Air Force Base Attack : नायजरची राजधानी नियामे येथे बुधवारी (28 जानेवारी) मध्यरात्री एक भीषण दहशतवादी हल्ला झाला असून यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडात खळबळ उडाली आहे.
Niger Air Force Base Attack
Niger Air Force Base AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Niger Air Force Base Attack: नायजरची राजधानी नियामे येथे बुधवारी (28 जानेवारी) मध्यरात्री एक भीषण दहशतवादी हल्ला झाला असून यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडात खळबळ उडाली आहे. नियामे येथील डियोरी हमानी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या नायजर वायुसेनेच्या तळाला (Air Force Base) सशस्त्र हल्लेखोरांनी लक्ष्य केले. नायजरच्या सरकारी ब्रॉडकास्टरने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर स्वार होऊन आलेल्या मोठ्या गटाने हवाई तळावर हल्ला केला. यावेळी राजधानीत जोरदार गोळीबार आणि भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

नायजरच्या (Niger) सुरक्षा दलांनी या हल्ल्याला अत्यंत चोख प्रत्युत्तर दिले आणि हल्लेखोरांना तिथून पळवून लावले. या चकमकीत नायजरचे 4 सैनिक जखमी झाले असून सुरक्षा दलांच्या कारवाईत 20 हल्लेखोर ठार झाले आहेत, तर 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Niger Air Force Base Attack
Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश नायजर वायुसेनेच्या ताफ्यात असलेल्या ड्रोन्सना नष्ट करणे हा असावा, असा अंदाज संरक्षणातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जर्मनीच्या कोनराड एडेनॉयर फाऊंडेशनमधील साहेल कार्यक्रमाचे प्रमुख उल्फ लेसिंग यांच्या मते, जिहादी दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईत हे ड्रोन्स नायजर सैन्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.

अलीकडेच नायजरने आपल्या संरक्षणासाठी अनेक आधुनिक ड्रोन्स खरेदी केले होते, जे दोन्ही बाजूंच्या संघर्षात 'गेम चेंजर' ठरत आहेत. त्यामुळेच हे तंत्रज्ञान संपवण्यासाठी दहशतवाद्यांनी हा धाडसी हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या गोळीबारात विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या 'एयर कोटे डी आइवर' या पश्चिम आफ्रिकन एअरलाइनच्या एका विमानालाही फटका बसला असून विमानाच्या इंजिनला आणि पंखाला नुकसान झाले आहे.

Niger Air Force Base Attack
Pakistan: पाकिस्तानमध्ये 'संवैधानिक तख्तापलट'चा धोका! न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात; UNच्या धारधार टीकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ VIDEO

नायजर गेल्या अनेक वर्षांपासून अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (IS) समर्थित दहशतवादी गटांच्या हिंसाचाराचा सामना करत आहे. 2023 मध्ये झालेल्या लष्करी तख्तापलटपासून नायजरची राजकीय स्थिरता धोक्यात आली असून शेजारील बुर्किना फासो आणि माली या देशांप्रमाणेच येथेही लष्करी राजवट आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण नियामे शहरात आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात 2025 पासून दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली असून राजधानीच्या मुख्य हवाई तळावर झालेला हा हल्ला नायजरच्या सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com