ऐन उन्हाळ्यात गावठी, ब्याडगी मिरचीचा भडका; कोकम सोलेही महागली, राज्यभरात पुरूमेंताच्या खरेदीसाठी लगबग सुरू

Gaunti Byadgi Chilli Prices: राज्यभरात पुरूमेंताच्या तयारीची लगबग सुरू आहे. खास पावसाळ्यात तिखट बनविण्यासाठी लागणारी मिरची व इतर साहित्य खरेदी वाढली असली, तरी मिरच्यांच्या दराचा भडका उडाला आहे.
Gaunti Byadgi Chilli Prices
Gaunti Byadgi Chilli PricesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यभरात पुरूमेंताच्या तयारीची लगबग सुरू आहे. खास पावसाळ्यात तिखट बनविण्यासाठी लागणारी मिरची व इतर साहित्य खरेदी वाढली असली, तरी मिरच्यांच्या दराचा भडका उडाला आहे. स्थानिक गावठी मिरची तब्बल बाराशे रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच ब्याडगी मिरची ६०० रुपये आणि कुणकूर मिरची ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

त्यासोबतच इतरही विविध प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. आता पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने मिरच्या आणि मसाल्याच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मिरचीसोबत लसूण आणि मसाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

Gaunti Byadgi Chilli Prices
Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

वाढत्या महागाईमुळे अनेकांना बाजारात पाकिटातून विकली जाणारी मिरची पावडर घेणेच सोयीस्कर वाटत आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने घरी मिरच्या वाळवून मिरची पावडर करणारे खवय्ये मात्र मिरची आणि इतर साहित्य परवडत नसले तरी विकत घेऊन चटणी बनवत आहेत.

Gaunti Byadgi Chilli Prices
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

कोकमचे उत्पादन घटले

यासोबतच पावसाळ्यासाठी लागणारी कोकम सोले तब्बल ३०० रुपये पावकिलो आणि हजार रुपये किलो दराने बाजारात विकली जात आहेत. यंदाही कोकमचे पीक अपेक्षेप्रमाणे न झाल्याने दरवाढ कायम आहे. आगळ १५० ते २०० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चिंच ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. यासोबतच बाजारात सुकी मासळी, उकडे तांदूळ, अळसांदे व इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

फळांच्या राजाची स्वस्ताई

फळांचा राजा आंब्याची आवक राज्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अवघ्या ४०० रुपयांना एक डझन मानकुराद आंबे बाजारात विकले जात आहेत. यासोबतच फणसाचे गरे, जांभळे आणि करवंदे आदी देखील प्रतिवाटा ५० रुपये दराने विकले जात आहेत. बाजारात या हंगामी रानमेव्याची खरेदी अनेकजण करताना दिसतात. मात्र लिंबूचे दर बरेच वधारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com