Goa Pune Flight: सायंकाळी साडे सहाला पोहोचणारे विमान रात्री दोनला उतरले; गोवा – पुणे फ्लाईटला 8 तासांचा विलंब, प्रवाशांचा संताप

Goa Pune Spicejet Flight Delayed: याबाबत स्पष्टीकरण देताना स्पाईस जेट कंपनीने विलंबाला विमानात तांत्रिक बिघाडाचे कारण दिले आहे.
Pune Goa Flight
SpiceJetDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोव्यातून पुण्याला जाणाऱ्या विमानाला तब्बल आठ तासांचा विलंब झाला. गुरुवारी (१९ जून) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सायंकाळी साडे सहा वाजता विमान उड्डाण घेणार होते. पण, या विमानाने उशीरा रात्री उड्डाण केल्यानंतर दोन वाजता पुण्यात उतरले. स्पाईस जेट विमान कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एसजी – १०८० हे स्पाईस जेट कंपनीचे विमान गुरुवारी पुण्यात येणार होते. सायंकाळी ५.२० वाजता उड्डाण घेऊन हे विमान पुण्यात सायंकाळी ६.२५ मिनिटांनी दाखल होणे अपेक्षित होते.

पण, विमानाच्या उड्डाणाला आठ तासांचा विलंब झाला आणि विमानाने उत्तररात्री ०१ वाजून २२ मिनिटांनी उड्डाण केले आणि विमान २.०८ वाजता पुण्यात दाखल झाले. यामुळे ५० प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Pune Goa Flight
DGCA ने 'इंडिगो'कडून मागवला अहवाल; गोव्यातून लखनऊला जाणाऱ्या विमानाचा उड्डाण घेताच गेला होता तोल

पुण्यातील एका प्रवाशांने याबाबत कंपनीच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. कंपनीने विमानाला विलंब होणार असल्याची पूर्वकल्पना दिली नाही तसेच, विमानतळावर सुविधा देखील देण्यात आल्या नाहीत असा आरोप या प्रवाशाने केला. कुटुंबीयांसोबत प्रवास करणाऱ्या या प्रवाशासोबत दीड वर्षाचे बाळ देखील होते.

याबाबत स्पष्टीकरण देताना स्पाईस जेट कंपनीने विलंबाला विमानात तांत्रिक बिघाडाचे कारण दिले आहे. केबिन क्रू, प्रवासी आणि विमानाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे म्हणत कंपनीने विलंब झाल्याचे सांगितले.

Pune Goa Flight
Goa Assembly Monsoon Session 2025: 21 जुलैपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन; कालावधीवरुन विरोधकांची टीका

दरम्यान, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईटला आठ तासांचा विलंब झाल्याने जयपूरला जाणाऱ्या याच फ्लाईटला अजून विलंब झाला. जयपूरला जाणाऱ्या या फ्लाईटने रात्री साडे सात वाजता उड्डाण करुन ९.५० वाजता लँड करणे अपेक्षित होते. पण, गोव्यातून यायला उशीर झाल्याने या फ्लाईटने पहाटे तीन वाजता उड्डाण करुन फ्लाईट ४.५४ वाजता जयपूरमध्ये उतरली.

गोवा ते पुणे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द करुन पूर्ण रिफंड देण्याची मागणी केली. प्रवाशांना विमानतळावर आवश्यक सुविधा न पुरवल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com