DGCA ने 'इंडिगो'कडून मागवला अहवाल; गोव्यातून लखनऊला जाणाऱ्या विमानाचा उड्डाण घेताच गेला होता तोल

Goa Lucknow Indigo Flight: गोव्यातून इंडिगो कंपनीचे ६ई - ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमीनीच्या दिशेने येऊ लागले.
Indigo flight loses balance | Aviation regulator DGCA
Goa-Lucknow flight incidentDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातून लखनऊला जाणाऱ्या विमानाचा उड्डाण घेताच तोल घेल्याची घडली होती, याप्रकरणी डीजीसीएने इंडिगो विमान कंपनीकडून अहवाल मागवला आहे. दुसरीकडे कंपनीने एअर टर्ब्युलन्समुळे ही घटना घडल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी (१६ जून) इंडिगोच्या विमानाने गोव्यातून लखनऊसाठी उड्डाण घेताच ही घटना घडली.

विमान लखनऊच्या विमानतळावर उतरल्यानंतर एका महिला प्रवाशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. महिला प्रवासी अलहमरा खान यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता.

Indigo flight loses balance | Aviation regulator DGCA
Aman Gupta: 'तेव्हा गोव्यात भारतीयांना आदर मिळत नव्हता...', Boat च्या मालकाने सांगितली आठवण; म्हणाला, ‘दिल चाहता है’ची स्टोरीही आमचीच

गोव्यातून इंडिगो कंपनीचे ६ई - ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमीनीच्या दिशेने येऊ लागले. विमान कोसळणार की या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला, अशी पोस्ट खान यांनी सोशल मिडियावर केली होती.

यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. तथापि, वैमानिकाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. विमान संध्याकाळी ६:०८ वाजता अमौसी विमानतळावर उतरले. त्यात १७२ प्रवासी होते.

Indigo flight loses balance | Aviation regulator DGCA
Goa Assembly Monsoon Session 2025: 21 जुलैपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन; कालावधीवरुन विरोधकांची टीका

दरम्यान, डीजीसीएने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअरलाइन्सकडून संपूर्ण अहवाल मागितला आहे. विमानात टर्ब्युलन्सचे कारण देत एअरलाइन्सने सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

"टर्ब्युलन्स आल्याने विमानाला हेलकावे बसले. वैमानिकाने हुशारीने या परिस्थितीतून विमानाला नियंत्रित केले. त्याच वेळी, ही माहिती प्रवाशांना सांगायला हवी होती, जी दिली गेली नाही. भविष्यात याची काळजी घेतली जाईल," असे इंडिगोने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com