
पणजी: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात २१ (जुलै) तारखेपासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होणारे हे अधिवेशन पंधरा दिवस चालणार आले. याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलीय. विधानसभेच्या कालावधीवरुन विरोधकांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
२१ जुलै २०२५ रोजी सुरु होणारे अधिवेशन ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. यात चार दिवस सुट्टी वगळता पंधरा दिवस अधिवेशन चालणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पावसाळी अधिवेशनाबाबत यापूर्वीच माहिती दिली होती.
आगामी अधिवेशनात महत्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच, अर्थसंकल्पातील मागण्यांवर देखील चर्चा अपेक्षित आहे. विरोधक या अधिवेशनात भ्रष्टाचार, गुन्हे, कला अकादमी, पर्यटन या मुद्यावरुन सरकारला घेरताना दिसेल.
कालावधीवरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
"भाजप सरकार गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या आश्वासनांप्रमाणेच विधानसभेच्या अधिवेशनांचा कालावधी देखील कमी करत आहे. आठव्या विधानसभेचे दहावे अधिवेशन फक्त १५ दिवसांसाठी बोलवले आहे. गेल्या वर्षी ते १८ दिवसांचे होते आणि आता ३ दिवस कमी करण्यात आले आहेत."
"लोकशाही आणि राज्यातील जनतेच्या आवाजाला कमी लेखण्याच्या भाजपच्या कृत्याचा मी निषेध करतो. विधानसभेचे अधिवेशन कमी करणे हे राज्याच्या आर्थिक स्थिती किंवा बेरोजगारी असो, प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या अपयशाचे समर्थन करते. आम्ही या भ्रष्ट सरकारचा पर्दाफाश करू आणि ते प्रशासनात कसे अपयशी ठरले ते दाखवून देऊ," असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळातील फेरबदल?
कला, संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी कोणाचा शपथविधी होणार याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. याशिवाय मंत्रिमंडळातून आणखी दोघांना नारळ देऊन एकूण तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, तिघांचा शपथविधी होणार का सध्या फक्त गावडे यांची रिकामी जागा भरली जाणार याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. पण, पावसाळी अधिवेशनापूर्वी संभाव्य बदल होणे अपेक्षित मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.