Goa: गोपाळराव मयेकर अनंतात विलीन

सरांचेही सर म्हणजेच मयेकर सर : मान्यवरांची आदरांजली
Goa Gopalrao Mayekar
Goa Gopalrao Mayekar Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, (Ex Education Minister) माजी खासदार, ज्येष्ठ मगो (Mgp Leader) नेते, गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्ष, (Gomantak Marathi Akadamy) ज्ञानेश्वरीचे (Dnyaneswari) गाढे अभ्यासक तथा साहित्यिक प्राचार्य गोपाळराव (Professor Gopalrao Mayekar) मयेकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) दुपारी दत्तवाडी-म्हापसा (Mapusa) येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयेकरसर हे गोव्यातील शिक्षकांचे आदर्श होते. त्यामुळे ‘सरांचेही सर म्हणजेच मयेकर सर’ अशी भावना अनेकांनी व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली. या वेळी मयेकर सरांच्या चाहत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राजू (raju) आणि शैलेश (sheilesh) यांनी चिताग्नी दिला. या वेळी त्यांची कन्या डॉ. रेश्मा (Reshma) आणि मयेकर सरांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रा. मयेकर यांचे पार्थिव त्यांच्या गणेशपुरी-म्हापसा (Ganeshpuri Mapusa) येथील ‘रविबिंब’ या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

Goa Gopalrao Mayekar
Goa:पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीत हाहाकार

या वेळी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, (Laxmikant Parsekar) शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, (Subhash Shirodkar) माजी आमदार धर्मा चोडणकर, (Dharma Chodankar) गोवा कला महाविद्यालयाचे (Goa Art College) प्राचार्य महेश (Professor Mahesh Vengurlekar) वेंगुर्लेकर, त्याच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दत्ता नावेलकर, (Professor Datta Navelkar) ज्ञानप्रसारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर, (Dr. Dilip Arolkar) कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष कवठणकर, (Subhash Kavathankar) इन्स्टिट्युट मिनेझीस ब्रागांझाचे माजी अध्यक्ष संजय हरमलकर, (Sanjay Harmalkar) माजी सदस्य-सचिव गोरख मांद्रेकर, (Gorakh Mandrekar) प्रा. बबन पंडित, प्रा. सुमन कनयाळकर, प्रा. सुभाष नाईक, गोमंतक मराठी भाषा परिषदेचे माजी अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, गोमंतक मराठी अकादमीचे (Gomantak Marathi Akadamy) अध्यक्ष प्रदीप घाडी, मगोचे केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, माजी नगरसेवक तुषार टोपले, नारायण राठवड, गोविंद नाईक, प्रदीप जोशी, एकनाथ म्हापसेकर, हनुमंत वारंग, प्रदीप चोडणकर यांची उपस्थिती होती. तसेच त्यांचे माजी विद्यार्थी, मराठी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, मगो पक्षाचे कार्यकर्ते, मराठी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षण व साहित्य-संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Goa Gopalrao Mayekar
Goa: वास्को नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात पाणीच पाणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com