दाबोळी: वास्को नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात (Vasco Civil suplies Department) पावसाचे पाणी (water) शिरत आहे. कर्मचाऱ्यांचा कार्यालयात भरत असलेले पाणी काढण्यातच वेळ जातो. तर लोकांना पाण्यात उभे राहून आपली कामे करून घ्यावी लागतात. येथील पालिका इमारतीत असलेले नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाला पावसाच्या पाण्याची गळती लागली असून, त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पाणी काढून काढून घालमेल झाली आहे. तसेच या कार्यालयात आपल्या वैयक्तिक कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यात उभे राहून आपले काम करून घ्यावे लागते. या कार्यालयातील कर्मचारी अक्षरशा या पाण्यात राहून नागरिकांची कामे करताना दिसतात. तसेच कार्यालयीन कामकाजाच्या फाइल्स (Files) उघड्यावर असल्याने त्या गहाळ होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या इमारतीचे नूतनीकरणाचे काम चालू असून वरील मजला झाकला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान नागरी पुरवठा कार्यालयासाठी नवीन जागा पाहण्याच्या हालचाली सुरू असून अजून त्यांना जागा मिळाली नसल्याने त्यांना या अडगळीच्या जागेत काम करावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी हीच परिस्थिती होती. तेव्हा सदर बातमी वर्तमानपत्रात (News paper) झळकताच नागरी पुरवठा खात्याचे संचालकांनी या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली होती. तसेच त्याने यावेळी मुख्याधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. मात्र अजून त्यांना कार्यालय (Office) मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कार्यालयीन संगणक (Computer) व इतर वस्तूंची या पावसाच्या पाण्यामुळे वाताहात होण्याच्या स्थितीमध्ये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.