Goa:पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीत हाहाकार

अनेक भागात जलमय स्थिती, रिव्हर फ्रंट पाण्याखाली (Goa)
In Bicholi, the river was flooded, Goa
In Bicholi, the river was flooded, GoaTukaram Swant / Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली(Bicholim): कोसळधार पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीसह तालुक्यातील (Bicholim Taluka) बहूतेक भागात हाहाकार माजला. कालपासून पडणाऱ्या कोसळधार पावसाने मध्यरात्रीनंतर रौद्रावतार धारण केल्यानंतर डिचोलीसह, शापोरा, वाळवंटी आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नद्यांचे पाणी बाहेर फुटून नदीकाठचा परिसर जलमय झाला. (Goa)

In Bicholi, the river was flooded, Goa
In Bicholi, the river was flooded, GoaTukaram Swant / Dainik Gomantak

रिव्हर फ्रंट पाण्याखाली

डिचोली नदीनेही 4.2 मीटर ही धोक्याची पातळी ओलांडताना पाणी नदीबाहेर वाहू लागले. त्यामुळे नदीकाठी जलमय स्थिती निर्माण झाली. पिराची कोंड, आयडीसी परिसरात जोगीवाड्याच्या मागच्या बाजूने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. तेथील विठ्ठल वेर्णेकर यांची विहीरीही पूर्ण पाण्याखाली आली. बंदिरवाडा तसेच अन्य काही घरांमध्ये पाणी शिरले. मात्र मोठी मानहानी होणापासून वाचली. दोन्ही पुलांच्या मध्ये असणाऱ्या 'रिव्हर फ्रंट' प्रकल्पामध्येही पाणी घुसले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल जवळील 'आर्क' पाण्याखाली गेल्याने सकाळी दीनदयाळ भवनसमोरील रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

In Bicholi, the river was flooded, Goa
Goa: अंजुणे धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; चारही दरवाजे खुले

चाळीस जणांचे स्थलांतर

नद्या फुटल्याने साळ, हरवळेसह, सारमानस, विठ्ठलापूर, कुडणे आदी भागात घरांनी पाणी घुसले. अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षकांनी मिळून पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली. तालुक्यात विविध भागात मिळून 40 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे लागले. काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला, तर पाळी येथील सातजणांना भामई पोलिस चौकीत स्थलांतरीत करण्यात आले. अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख तथा डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com