Sanjivani Sugar Factory : सरकारने कामगारांना अन्य खात्यांमध्ये सामावून घ्यावे : ख्रिस्तोफर फोन्सेका

कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आयटक संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका आणि बालाजी मयेकर यांनी सोमवारी सभा घेतली
Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar FactoryDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या 177 कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आयटक संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका आणि बालाजी मयेकर यांनी सोमवारी सभा घेतली.

सरकारने या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊ नये. हा निर्णय योग्य नाही. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू राहण्यासठी त्यांना अन्य खात्यांमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली.

Sanjivani Sugar Factory
Anant Kerur Goa: गोव्याच्या विद्यार्थ्याचे भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश; मिळवला 39 वा क्रमांक

आज झालेल्या कामगारांच्या सभेत कारखान्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. याच ठिकाणी त्यांनी वरील मागणी केली आहे. संजीवनी साखर कारखान्यात कायमस्वरूपी 99 तर कंत्राटी पद्धतीवर 79 कर्मचारी आहेत.

गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नातील हा कारखाना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com