Rumdamol Dovorlim News: रूमडामळ दवर्लीत अज्ञाताने फोडल्या दोन कार; तणावाचे वातावरण

काही तरूण दररोज दाऊ पिऊन धिंगाणा घालत असल्याचा पंच सदस्यांचा आरोप
Rumdamol Dovorlim News
Rumdamol Dovorlim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Rumdamol Dovorlim News: रूमडामळ दवर्ली येथील अंजुमा शाळेजवळील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या दोन कारच्या काचा अज्ञाताने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही कारचे यात मोठे नुकसान झाले आहे. एका कारची मागील काच पूर्ण फोडली आहे.

तर दुसऱ्या कारच्या मागील काचेवर दगड मारून मोठे छिद्र पाडले आहे. तर या कारच्या समोरील काचही दगड मारून फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Rumdamol Dovorlim News
CM Pramod Sawant: विश्वजीत राणे आणि माझ्यात मतभेद नाहीत; विरोधक आमच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत...

याबाबत बोलताना रूमडामोळ दवर्लीचे पंच सदस्य उमरान पठाण म्हणाले की, एकूण तीन गाड्यांचे नुकसान केले आहे. या भागात दररोज काही तरुण दारू प्यायला बसतात. त्यातील काहीजण स्थानिकही आहेत. तर बाकीचे बहुतांश हे बाहेरील आहेत. ते येथे दंगा करत असतात.

त्यांच्यातील कुणीतरी हे कृत्य केल्याचा संशय पठाण यांनी व्यक्त केला. आधीच येथील वातावरण तणावाचे आहे. त्यात अशा घटनांमुळे तणावात आणखी भर पडणार आहे.

अशा प्रकरणांतून धार्मिक द्वेषाला खतपाणी घातले जात असल्याचा संशय आहे. पोलिसांना गस्त वाढविण्यााची विनंती केली आहे. मोकळ्या जागेत कुणालाही मद्यपान करण्यास बसू देऊ नये, अशी विनंती केली आहे. बाहेरचे लोक येऊन येथील शांतता नष्ट करत आहे.

Rumdamol Dovorlim News
Supreme Court on Mahadayi: म्हादई पाणी प्रश्नी सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी पुढील सुनावणी

स्थानिकांना याचा त्रास होत आहे. स्थानिक तरूणांनीही मद्यपान करू नये आणि रूमडामळ दवर्लीत शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रूमडामळ-दवर्ली येथे मागील काही दिवसांपासून, हिंदू-मुस्लिम वादामुळे तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वी येथील काही तरूणांनी क्रॉसची मोडतोड केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तीन तरूण क्रॉसची मोडतोड करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com