Illegal Cattle Transport: बेतोडा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; तीन गुरांची सुटका

Illegal Cattle Transport: फोंडा तालुक्यातील बेतोडा परिसरात रविवारी (ता.१ डिसेंबर)रात्री बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
Illegal Cattle Transport
Illegal Cattle TransportDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा तालुक्यातील बेतोडा परिसरात रविवारी (ता.१ डिसेंबर)रात्री बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. गोरक्षक, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि डीएसपीसीए–दक्षिण यांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघड झाला. संशयास्पद वाहन बेतोडा मार्गावर थांबवून तपास केल्यानंतर गुरांची तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान वाहनातून तीन गुरांची सुटका करण्यात आली. संबंधित गुरांना तत्काळ सुरक्षिततेसाठी स्थानिक गौशाळेत हलवण्यात आले. या घटनेतील वाहनाचा मालकावर यापूर्वीही गुरांची तस्करी आणि बेकायदेशीर वाहतुकीचे प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Illegal Cattle Transport
Goa IIT Project: रिवण, कोडारही गेले! गोव्यात 'आयआयटी'साठी मिळेना जागा; तंत्रशिक्षण खाते जमिनीच्या शोधात

डीएसपीसीए–दक्षिणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांनी फोंडा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. पोलीस आता वाहन मालक आणि रॅकेटमधील इतर संभाव्य सहभागींचा शोध घेत तपास पुढे नेत आहेत.

Illegal Cattle Transport
IFFI Goa 2025: गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय? आणखी एक ‘फ्लॉप’ आवृत्ती..

या कारवाईमुळे फोंडा–बेतोडा परिसरात बेकायदेशीर गुरांच्या वाहतुकीविरोधात कडक भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसंच वाहनाच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी, गोरक्षक, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com