Goa Crime: गुन्हेगारांना मोकळे सोडू नका

Goa Crime: आरजी : संबंधितावर कठोर कारवाईची मागणी
 Crime News
Crime NewsDainik Gomantak

Goa Crime: फोंडा तालुक्यातील गुन्ह्यात वाढ झाली असून गुन्हेगारांना मोकळे सोडू नका, अशी मागणी करीत रेव्होल्युशनरी गोवन्सचे कार्यकर्ते व इतरांनी एक निवेदन फोंडा पोलिसांना दिले. यासंबंधी फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांच्याशीही त्यांनी बोलणी केली.

विशेष म्हणजे कुंडईतील बलात्कार प्रकरणातील मनोज सूर्या नाईक हा गोमंतकीय नसून तो रामनगर - कर्नाटक येथील असल्याचे सांगून गोमंतकीयांची बदनामी हेच लोक करीत असून गोव्यात बिगर गोमंतकीयांमुळे गुन्हे वाढले असल्याचे आरजीवाल्यांनी सांगितले.

 Crime News
Ration Card: सरकारने दिला मोठा झटका, लाखो राशनकार्ड होणार रद्द; संपूर्ण यादी तयार

यावेळी रेव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे, शैलेश नाईक तसेच प्रशांत च्यारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पिळये - धारबांदोडा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील पोलिसाला सामान्याप्रमाणे वागणूक द्या आणि त्याच्यावर कडक कारवाई करा, असे सांगताना घोडकादेववाडा - कुंडई येथील एका मुलीवरील बलात्कार प्रकरणातील मनोज सूर्या नाईक हा मूळ गोमंतकीय नसून तो रामनगर येथील आहे, आणि गोमंतकीयांचे नाईक हे आडनाव धारण करून बिनधास्तपणे गोव्यात राहत असल्याचे सांगण्यात आले.

 Crime News
चीनमधून MBBS करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 'हे' महत्त्वाचे नियम माहित असले पाहिजे अन्याथा...

अशाप्रकारे गोमंतकीय नाईक आडनाव घेण्याचे प्रमाण वाढले असून संबंधितांनी त्याची चौकशी करावी आणि कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, बेतोडा येथील एका निष्पाप इसमाचा उघड्या पाण्याच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याने या प्रकाराला जबाबदार पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून पुढील कारवाई करण्याची मागणी आरजीवाल्यांनी केली आहे.

 Crime News
Forbes List: फोर्ब्सच्या 20 आशियाई महिला बिझनेस वुमनच्या यादीत 'तीन भारतीय महिला'

कुंडईत ‘टॉवर’ला विरोध

कुंडई येथील विद्यालयाच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी संबंधित कंत्राटदार पोलिस फौजफाटा घेऊन आल्याने आरजीवाल्यांनी या प्रकाराचा निषेध करून स्थानिकांचा विद्यालयाच्या आवारात टॉवर उभारण्यास तीव्र विरोध असताना आणि कालबाह्य झालेला दाखला घेऊन त्यच्या आधारे टॉवरसाठी जबरदस्ती करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व इतरांवरही कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com