चीनमधून MBBS करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 'हे' महत्त्वाचे नियम माहित असले पाहिजे अन्यथा...

चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नवीन नियमांबाबत सरकारने पुन्हा भारतीय विद्यार्थ्यांना अलर्ट केले आहे.
MBBS Student
MBBS StudentDainik Gomantak
Published on
Updated on

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नवीन नियमांबाबत पुन्हा अलर्ट केले आहे. 18 नोव्हेंबर 2021 पासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार परदेशात एमबीबीएस (MBBS) केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्या देशात प्रथम वैद्यकीय लायसन्स घेणे बंधनकारक आहे. जर त्याला लायसन्स मिळाले नसेल तर तो फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स इन इंडिया (FMGE) परीक्षेत बसण्यासाठी पात्र मानला जाणार नाही.

परदेशातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतल्‍यानंतर तुम्‍हाला भारतात औषधोपचार करायचा असेल, तर यासाठी तुम्‍हाला FMGE नावाची परीक्षा द्यावी लागेल.फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन (FMGE) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच एखाद्याला भारतात डॉक्टरांचा मिळतो.ही परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण आहे.म्हणजेच, जर तुम्ही FMGE चाचणी पास केली नाही, तर तुम्ही भारतात कधीही औषधोपचार करू शकणार नाही.

नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) जारी केलेला हा नियम परदेशात शिकणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना लागू होतो. परंतु अलीकडेच, बीजिंगमधील भारतीय दूतावासाने या संदर्भात एक सजेशन जारी केला आहे. जो परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसारमाध्यमांसोबत शेअर केला आहे. यामध्ये विद्यार्थी (Student) आणि पालकांना सांगण्यात आले आहे की, जे वैद्यकीय विद्यार्थी 21 नोव्हेंबर 2021 नंतर परदेशात शिकण्यासाठी गेले आहेत. त्यांना केवळ तेथे लायसन्स घ्यावा लागणार नाही. तसेच, तुम्हाला इंग्रजी माध्यमातच शिक्षण घ्यावे लागेल. चीनमध्ये बहुतेक अभ्यास स्थानिक भाषांमध्ये केले जातात.

MBBS Student
Malabar Exercise: आजपासून जगाला दिसणार क्वाडची ताकद
  • चीनमध्ये लायसन्स न मिळाल्यास असिस्टेंट डॉक्टर बनू शकतो?

प्रत्यक्षात याबाबत पालकांच्या वतीने भारतीय दूतावासाकडून माहिती मागविण्यात आली होती. लायसन्स न मिळाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कर्जाचे हप्ते भरता यावेत आणि राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी तेथे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम करता येईल का, याचीही माहिती पालक घेत आहेत. यावेळी चिनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडून ही माहिती मागवण्यात आल्याचे चीनमधील (China) भारतीय दूतावासाने सांगितले

  • चीनमध्ये 23,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी घेत आहेत वैद्यकीय शिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चीनच्या विद्यापीठांमध्ये 23,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी (Indian Student) शिकत आहेत. त्यापैकी बहुतेक जण मिडिकलचे शिक्षण घेत आहेत. कोविड-संबंधित व्हिसा निर्बंधांच्या दोन वर्षांहून अधिक काळानंतर चीनने नुकतेच परतीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसा देणे सुरू केले. आतापर्यंत 350 हून अधिक विद्यार्थी भारतातून चीनमधील त्यांच्या महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी परतले आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांना परत येण्यासाठी संघर्ष करावा लागला कारण थेट फ्लाईट्स नाहीत बीजिंगमध्ये मर्यादित फ्लाईट्स सुविधांवर बोलणी करत आहेत

दरम्यान, चीनच्या मेडिकल कॉलेजने (Medical Collage) भारतासह इतर देशांतील नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारला नवीन अॅडव्हायझरी जारी करण्यास भाग पाडले आहे. दूतावासाने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की त्यांनी संबंधित चिनी अधिकारी आणि मेडिकल कॉलेजला माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com