..ते आरोप खोटे, बिनबुडाचे; 'भाजप' प्रदेशाध्यक्ष तानावडे

निवडणुकीपूर्वी मगोमध्ये स्वतःचे उमेदवार संभाळण्याची कुवत नाही तर..
Goa Politics : Sadanand Shet Tanawade
Goa Politics : Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी (Goa Politics) : मगो उमेदवारांची पळवापळवी भाजपने चालविली असल्याच्या आरोपांचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Tanavade) यांनी खंडन केले आहे. हे आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. निवडणुकीपूर्वी मगोमध्ये स्वतःचे उमेदवार संभाळण्याची कुवत नाही तर निवडणुकीनंतर त्यांना कसे सांभाळणार असा टोला त्यांनी लगावला. मगोने(MGP) तृणमूल काँग्रेसबरोबर (TMC) युती केल्याने त्यांचे काही उमेदवार संभ्रमात व चिंतेत आहेत तर मतदारांमध्ये संताप आहे. त्यामुळे मगो पक्षाच्या नेत्यांना उमेदवार तसेच कार्यकर्त्यांकडून विचारला जाणाऱ्या स्पष्टीकरणामुळे वैफल्यग्रस्त होऊन ढवळीकर भाजपला दोष देत सुटले असल्याचे तानावडे म्हणाले.

Goa Politics : Sadanand Shet Tanawade
बार्देशमधील आमदाराच्या 'भाजप' प्रवेशावर शिक्का मोर्तब..!

आगामी निवडणुकीत राज्यात भाजपची मगो पक्षाबरोबर युती असावी असे लोकांना वाटत होते त्यामुळे भाजपनेही त्याला मान्यत देत पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच मगोने हिंदूविरोधी तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने ही मगो मतदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवार सांभाळण्याची मगोची जबाबदारी आहे. यापूर्वी मगोने काँग्रेसबरोबर लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीत युती केली होती तर त्याचा परिणाम भाजपवर झाला नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसशी केलेल्या युतीचा भाजपच्या एकनिष्ठ मतदारांवर काहीच परिणाम होणार नाही, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.

मगो ही भाऊसाहेब बांदोडकराचा पक्ष होता. त्यांनी गोव्यात लोकांसाठी मोठे योगदान दिले आहे हे भाजपही मानतो. या पक्षाची परंवार हे ढवळीकर बंधू पुढे नेण्यात अपयशी ठरले आहेत. सध्याचा मगो हा पूर्वीचा राहिलेला नाही तर तो ढवळीकर बंधूची प्राव्हेट लिमिटेड कंपनी बनली आहे.

तृणमूल काँग्रेस वगळता मगोने इतर कोणत्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाशी युती केली असती तर मतदार संतप्त झाले नसते, मात्र ज्या पक्षाने पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूविरोधात हिंसात्मक कृत्य केले त्यांच्याबरोबर युती केल्याने मगो कार्यकर्ते तसेच मतदारांना रुचलेले नाही. त्यामुळे पेडणे मतदारसंघातील मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुदिन ढवळीकर

यांना स्पष्टीकरण करण्यास बोलावून घेतले. मतदारांची मते विचारात न घेता या मगोने निवडणुकीत ‘एम व्हिटाईन’साठी ही युती केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टीका तानावडे यांनी केली.भाजपचे राज्यातील 40 ही मतदारसंघात काम सुरू आहे. युतीवर हा पक्ष अवलंबून नाही. त्यामुळे मगोने युती केली नाही म्हणून काहीबिघडलेले नाही. ज्यांना भाजप प्रवेश देण्यात येत आहे त्यापूर्वी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला जातो. साळगाव मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा रोष येत्या काही दिवसांत मावळेल असे मत तानावडे यांनी व्यक्त केले.

Goa Politics : Sadanand Shet Tanawade
हुतात्मा स्मारकाला प्रियंका गांधींचे अभिवादन

भाजप पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे वातावरण राज्यभर तयार झाल्याने अनेकजण प्रवेश करू पाहत आहेत त्यांचे स्वागत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने व केलेल्या विकासकामांमुळे अनेकजणांना या पक्षात भवितव्य दिसत आहे असे ते म्हणाले.

सत्तेत राहून ‘मगो’ची गद्दारी!

भाजप सरकारमधून मगो पक्षाच्या आमदारांना काढून टाकण्यात आलेले नाही. त्यांचा तो आरोप खोटा आहे. शिरोडा मतदारसंघामधून विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मगो पक्ष सत्तेमध्ये होता. त्यामुळे या मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात मगोतर्फे उमेदवार उभा न करण्याची विनंती करण्यात आली होती, त्यांनी ती फेटाळली. त्यामुळे सत्तेत असलेला मगो भाजपविरोधातच प्रचार करत असल्याने हे तत्वात बसत नाही. सत्तेत राहून गद्दारी केल्यानेच त्यांना सरकारमधून जाण्याची पाळी आली अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com