गोव्यातील रात्रीच्‍या वेळचे ‘काळे’ कारनामे!

राजकारण्‍यांचे फलक होतात गायब; बॅनर्सवरील चेहऱ्यांना काळे
Goa Politics:  panels of politicians disappear
Goa Politics: panels of politicians disappearDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : तृणमूलच्या (Goa TMC) सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यभरातील बॅनर्सना त्यांच्या गोव्यातील आगमनादिवशी काळे फासण्यात आले (Goa Politics). दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे दिवाळीच्या शुभेच्‍छा देणारे फलक रात्रीत गायब झाले. आता तर मेरशी येथे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या बॅनर्सना काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकंदर निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचे ‘काळे’ कारनामे पुढे येत आहेत.

Goa Politics:  panels of politicians disappear
तोर्से येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

सध्या राज्यभरात राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. त्याची प्रचिती विविध आरोप-प्रत्यारोपांतून येत आहेच, पण राज्याच्या राजकारणाची दिशा भरकटू लागली आहे. मागील आठवड्यात ममता बॅनर्जी गोव्यात आल्या होत्या. त्या काळात त्यांच्या पक्षाने लावलेल्या स्वागत फलकांना भाजपच्या कार्यकर्त्‍यांनी काळे फासून निषेध नोंदविला. दोन दिवसांपूर्वी पणजीत मिरामार चौकात भाजपचे नेते उत्पल पर्रीकर यांचे दिवाळीच्‍या शुभेच्छा देणारे फलक लागले होते. ते अचानक एका रात्रीत गायब झाले. त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांनी हा ‘प्रताप’ केल्याची चर्चा आहे.

Goa Politics:  panels of politicians disappear
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक सुरू; रणनीतीवर होणार विशेष चर्चा

अलीकडे राज्‍यात भलतेच ‘फ्लेक्स वॉर’ सुरू आहे. सांताक्रुझचे इच्छुक उमेदवार आग्नेलो कुन्हा यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरोत यांच्यासह आपला फोटो असलेला बॅनर मेरशी येथे लावला होता. काही समाजकंटकांनी बॅनरवरील या दोघांच्याही तोंडाला काळे फासले आहे. हे विरोधकांचे कृत्य असल्याचा आरोप कुन्‍हा यांनी केला आहे.

राज्यात सगळीकडेच अशा घटनांना पेव फुटले आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून वादांना तोंड फुटत आहे. राजकारण्यांचा खेळ होतो, पण सर्वसामान्यांचा जीव जातो, अशी स्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे.

Goa Politics:  panels of politicians disappear
Goa Rain Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

तृणमूल काँग्रेसकडून तक्रार

बॅनर्सना काळे फासल्याबद्दल तृणमूल कॉँग्रेसने पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्‍यात कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र आज उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्या फलकांना काळे फासण्यात पणजी महापालिकेचा नगरसेवक आणि भाजपचा ओबीसी मोर्चा नेता सहभागी होता असा आरोप करून खळबळ उडवून दिली. ‘गोमन्‍तक’शी बोलताना ते म्हणाले, कोणताही पक्ष असो, ही वर्तणूक अशोभनीय आहे. सरकारची हुकूमशाही जास्त काळ चालणार नाही.

विरोधकांकडून आमच्या पक्षाचे बॕनर्स आणि पोस्टर्स फाडले जात आहेत. त्यास काळे फासले जात आहे. त्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रारही केली आहे. पण अजून हे प्रकार थांबलेले नाहीत. ही कृती गोव्यासारख्या सुसंस्कृत राज्याची प्रतिमा मलीन करणारी आहे.

- प्रतिभा बोरकर, गोव्‍यातील तृणमूलच्‍या नेत्‍या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com