ब्रेकिंग
Goa Politics : भाजपची (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू झाली असून गोव्याच्या निवडणुकीची (Goa Election) तयारी आणि रणनीती वर विशेष चर्चा होईल. या बैठकीमध्ये राज्यातील आठ भाजप नेते, पदाधिकारी सहभागी झाले असून आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो प्रथमच राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये सहभागी होत आहेत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी होत असून या कार्यकारणीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी आणि रणनीतीवर विशेष चर्चा होणार आहे. या कार्यकारणी मध्ये गोव्यातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे, संघटन मंत्री सतीश धोंड, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, विशेष उपस्थिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उपस्थित आहेत. याशिवाय निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीटी रवी हेही या बैठकीत दिल्लीत उपस्थित आहेत . ही बैठक दुपारी तीन वाजेपर्यंत वर्च्युअल पद्धतीने आणि प्रत्यक्ष अशा हायब्रीड पद्धतीने दिल्ली आणि संबंधित राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी होत आहे .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.