Pandurang Madkaikar Goa
Pandurang Madkaikar GoaDainik Gomantak

Goa Politics: "मी आधी भेटतो आणि त्यानंतरच याविषयावर बोलतो" मडकईकरांच्या आरोपावर सत्ताधारी बचावात्मक पवित्र्यात

Corruption In Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपण याविषयावर बोललो आहे, असे सांगत या प्रकरणातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे
Published on

Pandurang Madkaikar Bribery Allegation

पणजी: माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका छोट्या कामासाठी आपल्याकडून एका मंत्र्याने १५-२० लाख रुपये मागच्याच आठवड्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर तसे झालेच नसावे, असे सांगण्याचे धाडस कोणत्याही मंत्र्याने आजवर केलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपण याविषयावर बोललो आहे, असे सांगत या प्रकरणातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सारेजण बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.

आजवर सत्ताधारी भाजप आणि सरकारकडून मडकईकर यांच्या आरोपाचे खंडन करण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही 'असे काही झाले नसावे, असे स्पष्टपणे म्हटलेले नाही, त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले "आरोप कोणीही करू शकतो, पुरावे नसल्यास त्याला अर्थ राहत नाही". या आरोपांचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम नाही. दरम्यान, लाच प्रकरणी चौकशी करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल करण्यात आली आहे. काशिनाथ शेट्ये व इतर सहाजणांनी ही तक्रार दाखल केली आहे.

सुदिन, गोविंद म्हणतात....

वीजमंत्री असलेले मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तर फारच सावध भूमिका घेतली. त्यांनी मी आधी मडकईकर यांना मंगळवारी भेटतो आणि त्यानंतरच याविषयावर बोलतो, असे म्हटले आहे. मडकईकर यांनी केलेल्या आरोपांवरून चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटलेले नाही.

Pandurang Madkaikar Goa
Goa Politics: मडकईकर हे संतोष यांच्यापर्यंत पोचले कसे? 20 लाखांच्या लाच आरोपावरून रंगला कलगीतुरा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मंत्री गोविंद गावडे यांनी न विचारताच आपला कारभार पारदर्शी असल्याचे हा विषय काढल्यावर सांगून टाकले, पांडुरंग मडकईकर यांना वडील बंधू या नात्याने आपण पाहतो, त्यामुळे त्यांच्या विधानावर आपण प्रतिक्रिया देऊ इच्छीत नाही, अशी बचावात्मक भूमिका घेतली.

बाबूश म्हणतात, "नाव घ्या"

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मडकईकर यांना मंत्र्याचे नाव घेण्याचे आवाहन केले. मडकईकर हे माझे नजीकचे मित्र आहेत. आमचे संबंध पूर्वीपासून आहेत. ते माझे सहकारी होते. आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारत असाल तर एकतर त्यांनी नाव घेऊन आरोप करायला हवा होता. त्याही पुढे मंत्र्याने पैसे मागितले होते का, हेही स्पष्ट करायला पाहिजे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com