मडकईतील विकासाच्या बाबतीत आमदार सुदिन ढवळीकर यांच्या पदरी 'अपयश'

भाजप मंडळाचा आरोप: मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
Goa Politics : MLA Sudin Dhavlikar
Goa Politics : MLA Sudin DhavlikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मडकई (Madkai) आगशी तसेच दुर्भाट-रासई पुलाची कार्यवाही करण्याची गरज असून, विद्यमान आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhavlikar) यांच्याकडून या पुलांची अद्याप कार्यवाही झाली नसल्याने आमदार ढवळीकर हे मडकई मतदारसंघातील सर्वच विकासाच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत, असा आरोप मडकई भाजप (BJP) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी (Goa Politics) आज (रविवारी) पत्रकार परिषदेत केला.

Goa Politics : MLA Sudin Dhavlikar
मोक्याच्या क्षणी आरोग्यमंत्र्यांनी भाजपची बैठक सोडल्याने चर्चेला उधाण..!

मडकई मतदारसंघातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मडकई भाजप मंडळ कार्यरत आहे. आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच रोजगारांसंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना देण्यात आले आहे, अशी माहिती मडकई भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मडकई भाजपचे सुदेश भिंगी, सागर मुळवी, दिनेश वळवईकर, गजानन नाईक, जयराज नाईक तसेच सुभाष गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Politics : MLA Sudin Dhavlikar
‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंड

मडकईतील लोकांना आरोग्याच्यादृष्टीने सोयी-सुविधा पुरवणे गरजेच आहे. मडकई आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवताना सुसज्ज इस्पितळात रुपांतर करणे तसेच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच दंतवैद्य व प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.

रोजगारक्षम प्रकल्प नाहीच...

मडकई औद्योगिक वसाहत स्थापन केली असली तरी एकही रोजगारक्षम प्रकल्प या वसाहतीत आला नाही. बिगर गोमंतकीयांना मात्र रोजगारांत प्राधान्य मिळत असल्याचा आरोप मडकई भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सध्या मडकईत भाजपला वाढता पाठींबा असून, मागच्या लोकसभा व जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी त्याचा प्रत्यय आल्याचा दावाही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com