मोक्याच्या क्षणी आरोग्यमंत्र्यांनी भाजपची बैठक सोडल्याने चर्चेला उधाण..!

दोन तासांत बाहेर : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवेळी विश्वजीत राणे यांची बिघडली तब्येत
Goa BJP Vishwajeet Rane's health deteriorates during BJP national executive meeting.
Goa BJP Vishwajeet Rane's health deteriorates during BJP national executive meeting. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election) जिंकणे, हा मुख्य अजेंडा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय (Goa BJP) कार्यकारिणीच्या बैठकीतून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांना अर्ध्यावरून उठून जावे लागले. आपली तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांनी ही बैठक सोडली. त्यांची तब्येत बिघडली हे खरे असले तरी त्यांचे मोक्याच्या क्षणी असे वारंवार जाणे, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Goa BJP Vishwajeet Rane's health deteriorates during BJP national executive meeting.
‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंड

कोरोनानंतर प्रथमच हायब्रीड पद्धतीने झालेल्या कार्यकारिणी बैठकीला राज्यातून आठ भाजप नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अशा महत्त्वपूर्ण बैठकीवेळी आरोग्याच्या कारणामुळे विश्वजीत राणेंना अर्ध्यावर परतावे लागले. आधीच राणे हे पक्षाबद्दल नाराज असल्याचे बोलले जाते. त्यातच रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे आणखी भर पडली. त्यामुळे अलीकडच्या काळात ते वारंवार असे का वागतात? असा टोमणाही काहीजणांनी मारला आहे.

पंतप्रधानांच्या अभिनंदनासह काही महत्त्वाचे ठराव

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण केले आणि वाढत्या महागाईत इंधनवाढ रोखण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला. त्यामुळे इंधनाच्या किमती कमी झाल्या, यासाठी पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूरही केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. कार्यकर्त्यांना मारहाण करून खून, बलात्काराच्या घटना घडल्या. या विरोधात निषेधाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

Goa BJP Vishwajeet Rane's health deteriorates during BJP national executive meeting.
अरविंद केजरीवालांनी दिला पुती गावकरांना आपमध्ये प्रवेश

या कार्यक्रमांनाही आरोग्य मंत्र्यांची गैरहजेरी

गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत धारबांदोडा येथे फॉरेन्सिक विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री म्हणून राणे उपस्थित राहणे अपेक्षित असतानाही ते गैरहजर राहिले होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गती शक्ती हा उद्योजकांसाठीच्या बैठकीला उद्योगमंत्री म्हणून राणे उपस्थित राहणे अपेक्षित होते. तिथेही ते गैरहजर राहिले.

आता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही राणे यांनी अर्धवट सोडली.

नाराजी काय

भाजप सरकार बनविण्यात राणे यांचा मोठा वाटा आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना अद्यापही यश आलेले नाही. ते वारंवार पक्ष कार्यक्रमांना गैरहजर राहतात. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व राणे यांच्याकडे येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे राणे नाराज आहेत, हे रविवारी स्पष्ट झाले.

सुमारे ७ तास बैठक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्ली आणि संबंधित राज्यांच्या राजधानीमधून आज बैठक आयोजित केली होती. यात सदस्य, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यालय पदाधिकारी असे सुमारे १२० हून अधिक नेते सहभागी झाले होते. ही बैठक ७ तास चालली.

Goa BJP Vishwajeet Rane's health deteriorates during BJP national executive meeting.
दिल्लीसारखाच गोव्यात विकास होणार: केजरीवाल

आठजण उपस्थित

बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो आणि संघटन सचिव सतीश धोंड हे आठजण उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र ते बाहेरगावी गेल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

मी तपासणी केली; होंड्यात राणे यांचे स्पष्टीकरण : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन सत्र आटोपल्यानंतर मला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी बैठकीतून बाहेर पडलो. मात्र, समाजमाध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी आरोग्य तपासणी केली आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी होंडा येथील सभेत दिली. होंडा येथे संध्या ६.३० वाजता राणे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com