‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंड

आयुष इस्पितळासाठी पर्यावरण दाखला न मिळविल्याचा परिणाम
Pernem ‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंड
Pernem ‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंडDainik Gomantak

मोरजी: केंद्रीय आयुष मंत्रालयाअंतर्गत पेडणे (Pernem) धारगळ येथे सुरू असलेल्या आयुष इस्पितळाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण (Environment) दाखला मिळवण्यात आला नसल्याने गोवा राज्य (Goa State) पर्यावरण परिणाम छाननी प्राधीकरणाने 23 लाख रुपयांचा दंड अखिल भारतीय आयुर्वेदा संस्थेला ठोठावला आहे. या प्रकल्पाचा खर्च 230 कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. एकूण खर्चाच्या 1 टक्के दंड ठोठावण्यात येत असल्याने 23 लाख रुपयांचा दंड संस्थेला भरावा लागेल.

Pernem ‘अखिल भारतीय आयुर्वेदा’ला 23 लाख रुपयांचा दंड
अरविंद केजरीवालांनी दिला पुती गावकरांना आपमध्ये प्रवेश

याठिकाणी कंत्राटदाराकडून कामगारांना राहण्याची व्यवस्थित सोय केली नाही तसेच स्वच्छतेच्याबाबतीतही मोठी गैरसोय असल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल बनला आहे.

एक महिन्याच्या कालावधी

गोवा एसईआयएएची बैठक 5 ऑक्टोबर रोजी झाली होती. या बैठकीत हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दंड एका महिन्याच्या आत भरावा लागणार आहे, अशी नोटीस संस्थेला पाठविण्यात आली आहे. धारगळ येथे क्रीडा नगरीसाठी संपादन केलेल्या जागेत हा प्रकल्प सुमारे 2 लाख चौरस मीटर जमिनीत उभारला जात आहे.

100 खाटांचे इस्पितळ...

या संस्थेत आयुर्वेदाशी संबंधीत 500 शैक्षणिक पदांची व्यवस्था असेल. 100 खाटांचे इस्पितळही या ठिकाणी असणार आहे. होमियोपॅथी, युनानी आणि सिद्ध अभ्यासक्रमांचा ह्याच समावेश असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com