Goa Politics: "मुख्यमंत्री एकटेच काम करणार का?" लोबोंचा मंत्रिमंडळाला परखड सवाल

Michael Lobo statement: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाकडे लक्ष देणे योग्य नाही, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले
Michael Lobo latest news
Michael Lobo latest newsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाकडे लक्ष देणे योग्य नाही, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले, तर राज्यातील मंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचे दिसून येते, असे म्हणत लोबो यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रिमंडळावर टीका केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येसारख्या गंभीर विषयावरही मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागते, तर संबंधित खात्याचे मंत्री नेमके काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भटक्या कुत्र्यांसाठी पुनर्वसन केंद्रांची मागणी

मंत्र्यांनी आपापल्या खात्याची जबाबदारी स्वीकारून काम करावे, असा सल्ला लोबो यांनी दिला. गोव्याच्या किनारपट्टीवरील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लोबो यांनी केली आहे. या भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी आणि देखभालीसाठी केंद्रे उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी आधीच सहमती दर्शवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कळंगुटमधील दलालांवर तात्काळ कारवाई करा

कळंगुटच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दलालांच्या समस्येवरही आमदार मायकल लोबो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दलालांमुळे गोव्याच्या या लोकप्रिय पर्यटनस्थळाची प्रतिमा खराब होत असून, पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. "कळंगुटमध्ये एकही दलाल नको," असे ठामपणे सांगताना, जर ही समस्या थांबली नाही, तर आपण थेट कळंगुट पोलिस ठाण्याविरोधात तक्रार दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Michael Lobo latest news
Goa Politics: खरी कुजबुज; म्हावळिंगेत जागेचे गौडबंगाल

पोलिसांनी २४x७ गस्त घालावी, अन्यथा आंदोलन

लोबो यांनी पोलिसांना समुद्रकिनाऱ्यावर २४x७ गस्त घालण्याची विनंती केली आहे. दलालांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच, पार्किंगच्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या-घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हे आवश्यक आहे. दलाल आणि अनधिकृत गाईड्समुळे कळंगुटची प्रतिष्ठा धोक्यात आली असून, ती पुन्हा मिळवण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी कारवाई न केल्यास, पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही लोबो यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com