गोवा फॉरवर्ड का सोडला याबद्दल सरदेसाई यांच्याकडून खुलासा..!

उमेदवारी मिळणार नसल्याच्या कारणानं कांदोळकर गोवा फॉरवर्डला ठोकला राम-राम
Goa Politics : Kiran Kandolkar leaves Goa Forward party
Goa Politics : Kiran Kandolkar leaves Goa Forward party Dainik Gomantak

मडगाव: गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात युती झाल्यास स्वतःला आणि आपली पत्नी कविता या दोघांनाही उमेदवारी मिळणारच याची खात्री नसल्यानेच किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष सोडला (Goa Politics) असावा अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी दिली.

Goa Politics : Kiran Kandolkar leaves Goa Forward party
सडा लक्ष्मीनारायण प्रांगणात तुळशीविवाह उत्साहात

किरण कांदोळकर याना स्वतःला हळडोणा तर पत्नीला थिवी मध्ये उमेदवारी पाहिजे होती. ते दोघेही जिंकून येण्याची शक्यता असल्याने त्या दोघांनाही उमेदवारी मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असे मी त्यांना आश्वासन दिले मात्र त्यांना त्याची खात्री पटली नसेल यासाठीच त्यांनी राजीनामा दिला असावा असे सरदेसाई म्हणाले.

त्यांनी दिलेला राजीनामा आमच्यासाठी अनपेक्षित बाब असून ती धक्कादायक बाबही आहे. मी किरण कांदोळकर याना नेहमीच मान देत आलो आहे. आताही मी त्यांना बेस्ट ऑफ लक असेच म्हणेन असे सरदेसाई म्हणाले. गोय, गोयकार आणि गोयकारपण राखून ठेवण्यासाठी आमचा लढा चालूच असेल असे ते म्हणाले

Goa Politics : Kiran Kandolkar leaves Goa Forward party
गोव्यात वाढत्या महागाई विरोधात कॉंग्रेसची जनजागृती मोहीम!

गोव्यात भाजपचा पराभव करणे फक्त तृणमूल काँग्रेस पक्षालाच शक्य असून त्यामुळेच ममता दिदींच्या पक्षात प्रवेश केल्याचे कांदोळकर यांनी सांगितले. कांदोळकर यांनी आज सकाळीच गोवा फॉरवर्डच्या कार्याध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

यावेळी बोलताना लुईझीन फालेरो यांनी गोव्यातील बहुजन समाजाचा फक्त तृणमूल काँग्रेसवर विश्वास असून यापुढे बहुजन समाजातील आणखी नेते यापक्षात सामील होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com