गोव्यात वाढत्या महागाई विरोधात कॉंग्रेसची जनजागृती मोहीम!

केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात लोकांना पत्रकांचे वाटप करून निषेध व्यक्त केला.
P Chidambaram
P ChidambaramDainik Gomantak

दाबोळी : केंद्रातील भाजप सरकार व गोव्यातील सरकारने सामान्य जनतेला महागाईच्या विळख्यात टाकलेले आहे. जनतेच्या हितासाठी कार्य न करणाऱ्या भाजप सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष यश संपादन करून केंद्रात काँग्रेस अवश्य बाजी मारणार. कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली तेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष विजयी झाला असल्याची माहिती माजी केंद्रीय अर्थ मंत्री तथा काँग्रेस मुख्य प्रभारी पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी दिली.

गेल्या 7 वर्षांपासून सत्तेत असलेल्या केंद्रातील मोदी सरकारने जनतेला अच्छे दिनाचे गाजर 7 दाखवून देशातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे. गेल्या वर्षांत प्रचंड महागाई वाढली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात लोकांना पत्रकांचे वाटप करून निषेध व्यक्त केला.

P Chidambaram
जॉन नाझारेथ यांनी गोवा फॉरवर्डला दिली सोडचिठ्ठी

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे मुरगाव मतदारसंघात देशात वाढलेल्या महागाईच्या विरोधात भाजप सरकारच्या विरुद्ध घरोघरी पत्रकाचे वाटप करुन प्रचार केला. यावेळी माजी अर्थमंत्री तथा गोवा काँग्रेस मुख्य प्रभारी पी चिदंबरम तसेच गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा काँग्रेस नेते ज्यो डायस, काँग्रेस नेते एल्विस गोम्स, गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, महिला अध्यक्ष बिना नाईक, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, शरद चोपडेकर,नियाजी शेख, उमेश मांजरेकर, शेखर दाभोलकर, माजी नगराध्यक्ष भावना भोसले व इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी चिदंबरम याने मुरगाव कॉलनीतून महागाईच्या विरोधात प्रचार केला. नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना माहिती दिली की देशात भाजप सरकारने इंधन दरवाढ करून एक प्रकारे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याचा परिणाम त्यांना हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेशात हार पत्करुन भोगवे लागले. यापुढे भाजप सरकारला जनता माफ करणार नसल्याचे सांगितले.जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाने गोव्यात विधानसभा निवडणूकीत बाजी मारली तेव्हा केंद्रात काँग्रेस पक्षाने सत्ता केली असल्याचा इतिहास आहे.

यासाठी येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले.शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करून फक्त देशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केला. तीनही कृषी कायदे शेतकऱ्या विरुद्ध होते असे आम्ही पूर्वीपासून सांगत आलो होतो. तरीसुद्धा शेतकऱ्यांना मोदी सरकारने आंदोलन करण्यास भाग पाडले. देशात शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या भाजप सरकारला जनता योग्य धडा शिकवणार असल्याचे चिदंबरम शेवटी म्हणाले.

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की मोदी सरकार फक्त शेतकऱ्यांच्या विरोधात होते. त्यांना देशातील कृषी क्षेत्र मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा होते. पण देशातील शेतकऱ्यांनी एकसंघ राहिल्याने आज त्याचा विजय झाला आहे. देशातील कृषी क्षेत्र कधीच शेतकऱ्यापासून दूर जाणार नसल्याची माहिती चोडणकर यनी दिली.

P Chidambaram
गोवा फॉरवर्डला मोठा धक्का; किरण कांदोळकरांनी पक्षाला ठोकला राम-राम

गोवा सरकार फक्त युवकांना फसवण्यासाठी नोकरीचे आमिष दाखवित असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला. मुरगावात वाढत्या कोळश्यामुळे अनेकांना आजार पणाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीने येथील जनतेवर अन्याय असल्याचे माहिती आमोणकर यांनी सांगितले. मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे फक्त निवडणुका जवळ आल्याने रद्द केली असल्याची माहिती एल्विस गोम्स यांनी दिली.तसेच मुरगाव नगरपालिका कामगारांचा प्रश्न सोडविण्यास नगर विकास मंत्री पूर्ण पूणे अपयशी ठरले आहे. पालिकेतील उच्च पदावरील अधिकार्‍यांना वेळेवर वेतन प्राप्त होते.

मात्र इतर कामगारांना पगार देण्यासाठी दरवेळी दिरंगाई करतात. पालिकेतील अतिरिक्त कोट्यातील रक्कम कामगारांना देता येते. मात्र अधिकारी वर्ग यात असमर्थपणा दाखवत असल्याने कामगारांना वेतनाविना वंचित राहावे लागले.मुरगावात वाढता कोळसा कमी करण्यासाठी काॅग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी सांगितले आहे कि मुरगाव बंदरातून कोळसा हद्दपार करणार आहे. यासाठी गोव्यात कॉंग्रेस पक्ष येणे अत्यंत गरजेचे आहे. जनता यावेळी भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे एल्विस गोम्स शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com