Goa HSC Results 2021: डिचोलीतील 'या' शाळेचा शंभर टक्के निकाल

डिचोलीतील (Bicholim) विद्यावर्धक मंडळ संचलित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने (Shantadurga High School) उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
Shantadurga High School
Shantadurga High SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीतील (Bicholim) विद्यावर्धक मंडळ संचलित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने (Shantadurga High School) उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा या विद्यालयाचा बारावीचा सरासरी निकाल शंभर टक्के लागला आहे. मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन मंडळातर्फे गौरव करण्यात आला.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक शाखेत मिळून 129 विद्यार्थी विशेष श्रेणीत 304 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 156 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत कौशल मधुसूदन शिरगावकर याने 93 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. सविया गजानन परवार 90.50 टक्के गुण मिळवून द्वितीय तर रिचा रायू गावकर आणि कृपा अरुण मोरजकर प्रत्येकी 89.16 टक्के गुण मिळवून तृतीय आल्या.

Shantadurga High School
Goa HSC Result : कमलेश्वर विद्यालयातून धनश्रीने पटकावला पहिला क्रमांक

वाणिज्य शाखेत साची मनोहर लामगावकर हिने 98 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. रजिया खलंदर किल्लेदार 96.83 टक्के गुण मिळवून द्वितीय तर अमेय यज्ञेश्वर जोशी 95.33 टक्के गुण मिळवून तृतीय आला. विज्ञान शाखेत रिया लक्ष्मण गावस आणि तनया महेश तळकर, यांनी प्रत्येकी 93.67 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. प्रचिती प्रल्हाद देसाई हिने 90 टक्के गुण मिळवून द्वितीय तर पृष्टी प्रकाश पाटील 88.50 टक्के गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले. व्यावसायिक शाखेत संजूकुमारी परीक्षण साहनी हिने 78.62 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर चेताली हनुमंत कळंगुटकर 75 टक्के गुण मिळवून द्वितीय तर किशन नागेश सालेलकर 73.75 टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com