Goa : "संस्था सभासदांच्या कर्तृत्वाने मोठ्या होतात"

लायन्स क्लब (Lions Club) रावणफोंड तर्फे कोविड योद्ध्यांचा (Covid warriors) गौरव
आके बायश प्राथमिक आरोग्य केंद्राचे गौरव करण्यात आलेले कर्मचारी राधिका पागी व कपिल वेळीप यांच्या समवेत अविनाश प्रभुदेसाई, डॉ. मनोज प्रभुदेसाई, अजय देसाई, व्लारिको रॉड्रिग्स, सर्वानंद फळदेसाई, विठोबा देसाई
आके बायश प्राथमिक आरोग्य केंद्राचे गौरव करण्यात आलेले कर्मचारी राधिका पागी व कपिल वेळीप यांच्या समवेत अविनाश प्रभुदेसाई, डॉ. मनोज प्रभुदेसाई, अजय देसाई, व्लारिको रॉड्रिग्स, सर्वानंद फळदेसाई, विठोबा देसाईDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : कुठलिही संस्था (Institution) सभासदांच्या कर्तृत्वाने मोठ्या होतात असे उदगार गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (Goa Medical College) अस्थीरोग विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर मनोज प्रभुदेसाई यांनी काढले. लायन्स क्लब (Lions Club) रावणफोंड तर्फे कोविड योद्ध्यांचा (Covid warriors) गौरव करण्यात आयोजित केलेल्या व अधिकारग्रहण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. लायन्स क्लब (Lions Club) ही जगातील प्रमुख सेवा संस्था (Service organization) ओळखली जाते. याचे कारण या संस्थेचे सदस्य आपल्या कुवतीप्रमाणे समाजाची खास करुन गरजवंतांची सेवा करतात असेही डॉ. प्रभुदेसाई म्हणाले.

आके बायश प्राथमिक आरोग्य केंद्राचे गौरव करण्यात आलेले कर्मचारी राधिका पागी व कपिल वेळीप यांच्या समवेत अविनाश प्रभुदेसाई, डॉ. मनोज प्रभुदेसाई, अजय देसाई, व्लारिको रॉड्रिग्स, सर्वानंद फळदेसाई, विठोबा देसाई
Goa HSC Result 2021: मडगावच्या विज्ञान शाळेचा 100 टक्के निकाल

कोरोना महामारीच्या काळात लायन्स क्लब सारख्या संस्थांनी रुग्णांची सेवा केली व त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या त्यासाठी क्लबच्या सभासदांचे त्यांनी अभिनंदन केले. माजी प्रांताधिकारी उलाशिको रॉड्रिग्स यांनी अजय देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना अधिकारग्रहणाची शपथ देवविली. शिशु विकास विद्यालयाची स्थापना करुन लायन्स क्लब रावणफोंड संस्थेने स्थानिक विद्यार्थ्यांची शिक्षणाची चांगली सोय केली असे रॉड्रिग्स म्हणाले

आके बायश प्राथमिक आरोग्य केंद्राचे गौरव करण्यात आलेले कर्मचारी राधिका पागी व कपिल वेळीप यांच्या समवेत अविनाश प्रभुदेसाई, डॉ. मनोज प्रभुदेसाई, अजय देसाई, व्लारिको रॉड्रिग्स, सर्वानंद फळदेसाई, विठोबा देसाई
Goa: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा सरकारला दणका

या प्रसंगी आके बायश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी श्रीमती राधिका पागी व कपिल वेळीप यांचा शाल, श्रीफळ, देऊन गौरव करण्यात आला. शिशू विकास हायस्कुलमधील चार गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी क्लबच्या सभासदांनी आर्थिक मदत केली. या प्रसंगी लायन्स क्लब 317 प्रांताचे पदाधिकारी अविनाश प्रभुदेसाई, सर्वानंद फळदेसाई, मावळते अध्यक्ष गौतम गांवस देसाई उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com