Goa Politics: "धमक्या देणं सोडा, हल्ल्यामागे भाजप मंत्र्याचाच हात" पाटकरांनी दामू नाईकांना दिला 'हा' सल्ला

Goa Congress President statement: काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना, या हल्ल्यामागे भाजपच्याच एका मंत्र्याचा हात असल्याचा दावा केला आहे
Congress vs BJP Goa
Congress vs BJP GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी (१८ ऑक्टोबर) पुकारलेल्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना, या हल्ल्यामागे भाजपच्याच एका मंत्र्याचा हात असल्याचा दावा केला आहे.

हल्ल्यामागे भाजप मंत्र्याचा हात?

आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शनिवार (दि.२०) रोजी गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. "इतरांना धमकावण्याऐवजी दामू नाईक यांनी आपल्या पक्षात काय सुरू आहे, याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे," असे पाटकर म्हणाले.

रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दामू नाईक यांनी आपल्या पक्षातच या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Congress vs BJP Goa
Rama Kankonkar: ..जागे व्हा गोवेकरांनो! एका हाकेवरून नेते, समाजकार्यकर्ते आझाद मैदानात एकवटले; हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?

'भाजपची दादागिरी चालणार नाही'

आंदोलनादरम्यान काही संशयितांची नावे समोर आली असल्याचा दावाही पाटकर यांनी केला. "भाजपने आता कुणालाही धमकावू नये. कारण आता गोमंतकीय जनता एकत्र आली आहे आणि त्यांच्यासमोर भाजपची दादागिरी चालणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. दामू नाईक यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन खरा सूत्रधार शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com