Goa Politics: कोण 'बाहेरचे' आणि कोण 'आतले' हे सांगेकरच ठरवतील; सावित्री कवळेकर

सावित्री कवळेकर या केपे मतदारसंघातील असल्याने मुख्यमंत्र्यांनी होता टोमणा (Goa Politics)
Savitri Kavlekar Vs CM Dr Pramod Sawant (Goa Politics)
Savitri Kavlekar Vs CM Dr Pramod Sawant (Goa Politics)Dainik Gomantak

Goa Politics: सांगेत 'बाहेरचा' कोण आणि कोण 'आतला' हे सांगेकरच ठरवतील. 2022 च्या निवडणूकीत ते सगळे स्पष्ट होईल, असे वक्तव्य भाजप महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी उपाध्यक्षा (State Executive VP of BJP Mahila Morcha) सावित्री कवळेकर यांनी करत आपले आगामी इरादे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी (Wife of Deputy CM Babu Kavlekar) असलेल्या सावित्री कवळेकर यांनी सांगे मतदारसंघात भाजप उमेदवारीवर दावा केला होता. मात्र माजी आमदार सुभाष फळदेसाई (MLA Subbhash Faldesai) यांच्या वाढदिवसानिमित्त सांगेत आलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी सांगेचा (Sanguem Constituency) विकास करण्यासाठी बाहेरच्या माणसांची गरज नाही, असे म्हणत त्यांना फटकारले होते. सावित्री कवळेकर या केपे मतदारसंघातील (Quepem Constituency) असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना हा टोमणा मारला होता.

Savitri Kavlekar Vs CM Dr Pramod Sawant (Goa Politics)
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश चोडणकर कायम

मात्र काल रविवारी उगे येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या व्हिजन सांगे (Vision Sanguem) या संघटनेने आयोजित केलेल्या फुटबॉल सामन्याच्या अंतिम सामन्याच्यावेळी बोलताना थेट मुख्यमंत्र्यानाच आव्हान देत, मला कोण आतले आणि बाहेरचे म्हणतो त्याची मी पर्वा करीत नाही. ते 2022 च्या निवडणूकीत कळून चुकेल (Goa Assembly Election 2022). 2017 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला तरी मी सांगेकरांना सोडले नाही. त्यांच्या सुखदुःखात मी सामील होत आले आहे. कोविडच्यावेळी इतर लोक जेव्हा घरी झोपले होते तेव्हा मी लोकांबरोबर त्यांच्या मदतीला आले होते याची आठवण करून त्यांनी दिली.

Savitri Kavlekar Vs CM Dr Pramod Sawant (Goa Politics)
भाजपला मत म्हणजेच गोव्याचा विनाश अटळ: ओलेन्सिओ सिमोईश

उगे येथील जमीन सरकारने आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविल्याने या भागातील लोक भयभीत झाले आहेत. त्यांना दिलासा देताना लोकांनी घाबरून जाऊ नये त्यांच्या घामाच्या पैशांनी घेतलेल्या जमिनी सरकारच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असे म्हणत गरज पडल्यास लोकां बरोबर आपणही रस्त्यावर उतरू असे म्हणत त्यांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com