भाजपला मत म्हणजेच गोव्याचा विनाश अटळ: ओलेन्सिओ सिमोईश

पर्यावरणप्रेमी तथा समाजसेवक ओलेन्सिओ सिमोईश आणि सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य वसंत (गोपी) नाईक यांनी कुठ्ठाळी येथे जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Olencio Simoes
Olencio SimoesDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: काँग्रेसच्या (Congress) सहकार्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या संपूर्ण कायपालटासाठी आम्ही कार्यरत राहू. कारण प्रत्येक विभाग विकासात अपयशी ठरला आहे. स्वातंत्र्याची 60 वर्षे उलटूनही आम्ही मागे आहोत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एक तर भाजपला मत द्या आणि गोवा नष्ट करा किंवा काँग्रेसला मत द्या आणि गोवा वाचवा. कारण येथे अन्य कोणतेही पर्याय नाहीत. त्यासाठी काॅंग्रेस हा एकच पर्याय आहे, असे उद्गार ओलेन्सिओ सिमोईश (Olencio Simoes) यांनी काढले.

रविवारी पर्यावरणप्रेमी तथा समाजसेवक ओलेन्सिओ सिमोईश आणि सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य वसंत (गोपी) नाईक यांनी कुठ्ठाळी येथे जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सचिव जनार्दन भंडारी, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ज्यो डायस, महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युरी आलेमाव, अच्युत नाईक, राजू काब्राल, लीना जाधव, नितीन चोपडेकर, माजी पंच ॲन्थनी फर्नांडिस, अशोक डिसोझा, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पीटर फर्नांडिस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Olencio Simoes
Goa: जगप्रसिद्ध ग्रेटर डेन जीनचे दिस्टीलर जय धवन यांचा समूद्रात बुडून मृत्यू

यावेळी दिगंबर कामत म्हणाले, येणारे सरकार मध्यमवर्गीयांसह गरीब जनतेचे असेल. कारण लोकशाहीप्रधान सरकार फक्त काँग्रेस पक्ष देईल. भाजप मध्यमवर्गीय, तसेच गरिबांच्या पोटावर मारणारे सरकार असून जनता त्यांना वैतागली आहे. जुमला सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. प्रदूषणकारी प्रकल्प गोव्यात आणून जनतेचे आरोग्य धोक्यात आणण्याचे षडयंत्र भाजप करीत आहे. देशात बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने येथून भाजपला हद्दपार करणे युवकांच्या हाती आहे.

कॉंग्रेसला अपशकुन करण्यासाठी ‘आप’ गोव्यात

दिल्लीतील एका पक्षाने मोफत कडधान्य वाटून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. दिल्लीत सपशेल अपयशी ठरलेला आम आदमी पक्ष गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने काँग्रेस पक्षाला अपशकुन करण्याचे षडयंत्र रचत आहे. कोळसा माफियाविरोधात बोलण्याचे सामर्थ्य नसलेल्या ‘आप’ला येथे येऊन राजकारण करणे शोभत नाही. भाजपकडे काँग्रेस पक्षाला पराभूत करण्याची क्षमता नसल्याने त्यांनी दिल्लीतून ‘आप’ला येथे काँग्रेसची मते फोडण्यासाठी आयात केले आहे. केंद्र व राज्य सरकार कर्जात बुडाले असून यांना देशातील विमानतळ, रेल्वे, गॅस आस्थापने, जीवन विमा व इतर जे काही काँग्रेसने ७० वर्षांत कमावले ते भाजप सरकार विकण्याच्या स्थितीत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २८ वरून पाच वर आणण्याचे ध्येय गोवा काँग्रेस समितीने निश्चित केले आहे, असे गिरीश चोडणकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com