Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Speaker Ramesh Tawadkar: जर 'अशा' वृत्तींना सरकार आणि पक्ष थारा देणार असेल तर मान सन्मानासाठी आणि गोव्याच्या जनतेसाठी मी सभापतीपदाचा राजीनामा देऊन मोकळा होईन.
Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा
Speaker Ramesh Tawadkar & Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: भाजप सरकारमधील दोन दिग्गज नेते सभापती रमेश तवडकर आणि राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. त्यांच्यातील या संघर्षांमुळे पक्षशिस्तीला तडे जाऊ शकतात अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

जर 'अशा' वृत्तींना सरकार आणि पक्ष थारा देणार असेल तर मान सन्मानासाठी आणि गोव्याच्या जनतेसाठी मी सभापतीपदाचा राजीनामा देऊन मोकळा होईन. उटाच्या व्दिशतकपूर्ती कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सभापती रमेश तवडकरांनी थेट सरकार आणि भाजपला इशारा दिला. मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना तवडकरांनी नाव न घेता राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आपण सभापतीपदाची प्रतिष्ठा नेहमीच जपली आहे. तथापि, असे काही मंत्री आहेत जे वारंवार पदाचा आदर कमी करणारी वक्तव्ये करतात. असेच सुरु राहिल्यास मी सभापतीपदाचा राजीनामा देईन, अशी तंबीच सभापती तवडकरांनी दिली. राज्याचे क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सभापती रमेश तवडकरांचे नाव घेता डिवचले होते. त्यानंतर आता तवडकरांनी गावडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा
Goa Politics: पक्षांतरबंदी कायद्याचे धिंडवडे! 'दोन तृतीयांश’ची पळवाट सर्वांच्याच पथ्थ्यावर; संपादकीय

मंत्री गोविंद गावडे आणि माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचा नाद मी केव्हाच सोडून दिला आहे. ‘उटा’ संघटनेच्या मेळाव्याचे साधे निमंत्रणही मला देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही, तशी अपेक्षाही नव्हती. आदिवासी समाजासाठी मी काय केले आणि काय करत आहे याची जाणीव समाजाला आहे, असे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bison Attack Death Betoda Goa
Ramesh Tawadkar And Govind Gaude Patch up
Goa Dinesh Gawade Death Case
Goa Assembly Protest Chargesheet:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com