Goa Accident: भीषण अपघात! पणजीहून मडगावकडे जाणारी कार डिव्हायडरवर आदळून पेटली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Goa Car Catches Fire Goa: पणजीहून मडगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका कारचा भीषण झाल्याची माहिती समोर आलीय.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (NH-66) वर एक भीषण अपघात घडला. पणजीहून मडगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही क्षणांतच वाहनाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, कार भरधाव वेगाने प्रवास करत असताना होली क्रॉस श्राईनजवळ हा अपघात घडला. कारनेने प्रथम महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की कार थेट खालील सर्व्हिस रोडवर जाऊन कोसळली. अपघातानंतर वाहनातून धूर निघू लागला आणि काही वेळातच कारने पेट घेतला.

Goa Accident
Goa Chapoli Dam: चापोली धरण तुडुंब भरले! काणकोणवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला; गोमंतकीयांमध्ये समाधानाचे वातावरण

अपघाताचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी भरधाव वेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Goa Accident
Goa Fishing Season: बेतुल-मालीम जेटींवर मासेमारी हंगामाला विलंब; हवामान आणि मजूर टंचाईने मच्छीमार चिंतेत

या भीषण अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला, तर कारमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना बाहेर काढले उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC), बांबोळी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com