Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Goa Politics News Latest: काँग्रेससोबत युती केल्यास राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येईल आणि ते आपला परवडनारे नाही, त्यामुळे कळंगुटकरांचा राजीनामा स्वीकारला, असे अमित पालेकरांनी स्पष्ट केले.
Goa AAP President Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गोव्यात काँग्रेस सोबत युती करण्यास नकार दिला आहे. ‘निवडून आलेले आमदार भाजपमध्ये पक्षांतर करणार नाहीत याची खात्री द्या’, असे म्हणत आपने युतीची शक्यता खोडून काढली. केजरीवालांनी गोवा दौऱ्यात केलेल्या आरोपानंतर आप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक वाढला आहे.

गोवा आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश कळंगुटकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा बुधवारी राजीनामा दिला. कळंगुटकरांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर अध्यक्ष अमित पालेकरांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली.

“काँग्रेससोबत युतीच्या कारणावरुन त्यांनी राजीनामा दिला असला तरी पक्षाची याबाबत भूमिका स्पष्ट आहे. निवडणूक आलेले आमदार भाजपमध्ये पक्षांतर करणार नाहीत याची खात्री गोमंतकीयांना कोण देणार”, असे पालेकर म्हणाले.

Goa AAP President Amit Palekar
Konkan Railway: आरक्षित डबा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

काँग्रेसचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी देखील, “२०२७ मध्ये काँग्रेस बहुमतात आले तर निवडून आलेले आमदार भाजपमध्ये पक्षांतर करतील”, असे म्हटल्याचे पालेकर यांनी सांगितले.

दरम्यान, पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वाची २०२७ च्या निवडणुकीत विरोधकांसोबत युतीबाबत भूमिका स्पष्ट नसल्याचे कारण कळंगुटकरांनी दिले आहे. केजरीवालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भाजपला फायदा होईल आणि विरोध पक्षाला मिळणाऱ्या मतांना फटका बसेल, असा युक्तीवादही त्यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गोव्यात तीन दिवसांचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेसच्या मदतीने गेल्या १३ वर्षापासून भाजप सत्तेत आहे, असा आरोप केला. तसेच, २०२७ मध्ये आप राज्यात सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.

Goa AAP President Amit Palekar
सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

अमित पालेकरांनी आप गोमंतकीयांसोबत युती करेल, असे सांगताना राज्याला पक्षांतर आणि गैरव्यवस्थापनाचा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेससोबत युती केल्यास राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येईल आणि ते आपला परवडनारे नाही, त्यामुळे कळंगुटकरांचा राजीनामा स्वीकारला, असे पालेकरांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com