Teachers Day 2023: शिक्षण व्यवस्थेवर आता प्रशासनाची बारीक नजर; विद्या समीक्षा केंद्राची लवकरच स्थापना

Teachers Day 2023: प्रत्येक शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे रिपोर्टकार्ड तयार केले जाणार : शिक्षणमंत्री
62nd Teachers’ Day Function In Darbar Hall Goa
62nd Teachers’ Day Function In Darbar Hall Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

62nd Teachers’ Day Function In Darbar Hall Of Raj Bhavan: राज्यात शिक्षण खात्याच्या वतीने लवकरच विद्या समीक्षा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. हे केंद्र पणजीत असेल. त्याद्वारे पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या शाळांतील शिक्षण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार प्रत्येक शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे रिपोर्टकार्ड तयार केले जाणार असून ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या हातात पडेल, अशी माहिती शिक्षणमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राजभवन येथील दरबार हॉलमध्ये शिक्षण खात्याच्या वतीने मंगळवारी आयोजिलेल्या शासकीय शिक्षक दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, ‘एनसीईआरटी’चे संचालक शंभू घाडी उपस्थित होते. याप्रसंगी राज्य शिक्षण खात्याने यावर्षी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कारांचे आठ शिक्षकांना वितरण करण्यात आले.

62nd Teachers’ Day Function In Darbar Hall Goa
Drunk and Drive:14 लाख वाहने, अल्कोमीटर केवळ 84; मद्यपी वाहनचालकांना पकडणार कसे?

पुरस्कार प्रदान

या कार्यक्रमात नीता साळुंखे, आंतोनेत डिसोझा, सुचित्रा देसाई, हर्षिता नाईक, सोनिया माणगावकर, उमेशा सावळ-फळदेसाई, दत्ता परब आणि प्रेमानंद नाईक यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संचालक झिंगडे यांनी स्वागत केले आणि घाडी यांनी आभार मानले.

राज्यात बेरोजगारी नाही : मुख्यमंत्री

  1. राज्य सरकारने युवकांसाठी अप्रेंटिसशीप सुविधा सुरू केली. त्याद्वारे युवकांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

  2. शिवाय त्यांना ८ ते १० हजार रुपये विद्यावेतनही मिळणार आहे. अप्रेंटिसशीप करणाऱ्यांना पुढे विविध क्षेत्रांत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत.

  3. काम करणाऱ्यांना काम उपलब्ध असल्यामुळे राज्यात बेरोजगारीच नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com