Calangute: परराज्यातील कामगारांची पोलीस पडताळणी आवश्यक, शॅक व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जायला नको; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Pramod Sawant: कळंगुट, साळगाव तसेच शिवोली मतदारसंघनिहाय होऊ घातलेल्या ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रकल्पाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: राज्यातील विशेष करून किनारी भागातील न्याय व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचे पोलिस पडताळणी तसेच आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. येथील शॅकव्यवसाय हा स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय असून तो कुठल्याही स्थितीत स्थानिकांनी आपल्या हातून जाऊ देऊ नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कळंगुट येथे सांगितले.

कळंगुट, साळगाव तसेच शिवोली मतदारसंघनिहाय होऊ घातलेल्या ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रकल्पाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस,

जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, संदीप बांदोडकर, निहारिका मांद्रेकर, कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, साळगावचे सरपंच लुकास फर्नांडिस, हणजुण - कायसुव पंचायतीचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, पिळर्ण, सांगोल्डा, गिरी, नेरुल आणि रेईश मागुश आदी पंचायतींचे सरपंच - पंच सदस्य उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa Beach Shacks: 'सर्व शॅक्सना 11 नंतर खुलं राहण्याची परवानगी द्या; काहीजणांमुळे सर्वांवर अन्याय नको!' कळंगुटच्या आमदारांची विनवणी

मायकल लोबो, आमदार

राज्यातील पर्यटनात सुसूत्रता आणण्याचे काम सरकार आपल्यापरीने करीत असून भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. येथील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पर्यटक टॅक्सी तसेच शॅक व्यवसाय स्थानिक जनतेच्या हाती राहिला पाहिजे. भूमिगत वीजवाहिनीमुळे किनारी भागातील व्यावसायिकांना हक्काचा व विश्वासाचा वीजपुरवठा मिळणार आहे.

CM Pramod Sawant
Goa Beach Shacks: बेकायदा शॅक्सविरुद्ध कारवाईचा बडगा! 99 जणांना कारणे दाखवा नोटीस; पर्यटन खात्याची धडक मोहिम

केदार नाईक, आमदार

पर्यटकांना अधिक साधन सुविधा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या भुमीगत वीज वाहिन्यामुळे सांळगांवातील जीआयएस वीज केद्राला फायदा होणार असून त्यामुळे परिसरातील लोकांना वीज पुरवठा नियमीत तसेच अखंडीतपणे लाभणार आहे.

पन्नास कोटी खर्चून तयार होत असलेल्या या भुमीगत वीज प्रकल्पामुळे शिवोली तसेच परिसरातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. या कामासाठी मी वीज खात्याचे आभार मानले. सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी स्वागतपर भाषण केले व पंचक्रोशीतील समस्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर पाढा वाचला.

दिलायला लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com