

गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ गोवा पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का देणारा ठरत आहे. एका पर्यटकाने स्वतःचा अनुभव सांगत गोवा पोलिसांकडून लाच घेतल्याचा आणि पर्यटकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पर्यटकानं केला आहे.
त्या पर्यटकाने आपल्या व्हिडिओत सांगितलं की, “रविवारी मी मित्रांसोबत गोवा फिरायला गेलो होतो. मी स्वतः कार चालवत होतो. दोडामार्ग परिसरात गोवा पोलिसांनी माझी गाडी अडवली. मी सर्व कागदपत्रे दाखवली, पण ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरलो होतो. पोलिसांनी मला पाचशे रुपयांची मागणी केली. मी माझी चूक मान्य करत विनावाद पाचशे रुपये दिले, मात्र पावती मागितल्यावर पोलिसांनी ती देण्यास नकार दिला.”
तो पुढे म्हणतो, “माझ्यासोबत मित्र असल्यामुळे मी वाद न घालता निघालो, पण मनाशी ठरवलं की परतीच्या वेळी या प्रकाराचा पर्दाफाश करायचाच. मी दिलेले पैसे पाहून तिथे उभ्या इतर पर्यटकांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी त्या पोलिसांना सांगितले की, ज्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले तो तुम्हाला धडा शिकवेल. हे ऐकूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले.”
या घटनेनंतर रात्री नऊ वाजता तो पर्यटक पुन्हा त्या ठिकाणी परत आला. तेव्हा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. काही तरुण कर्नाटकातील होते. त्यांनी ड्रिंक केले होते, पण त्यांच्या ड्रायव्हरने ड्रिंक केलं नव्हतं. तरीदेखील गोवा पोलिसांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे त्या ड्रायव्हरला पोलिसांनी जबरदस्तीने बाहेर ओढून मारहाण केली, असं या पर्यटकानं म्हटलंय.
पर्यटकाने सांगितले की, “मी त्या ठिकाणी गेलो आणि शूटिंग सुरू केले, तेव्हाच तिथले सर्व पोलीस अचानक गायब झाले. किमान दहा मिनिटे मी एकटाच रस्त्यावर उभा होतो. हा संपूर्ण प्रकार पर्यटकानं व्हिडिओत टिपला आहे.” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.