Goa Police: गोवा पोलिसांना 'प्रेसिडेन्टस् कलर'चा मान! अमित शहांनी दिले 6 मिनिटांचे टार्गेट; आता 'नंबर 1'चे आव्हान

Goa Police Presidents Color Award: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक करताना पोलिसांच्या विविध जबाबदाऱ्यांवर विशेष भर दिला.
Goa Police Presidents Color Award
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक करताना पोलिसांच्या विविध जबाबदाऱ्यांवर विशेष भर दिला. गोवा हे आकाराने लहान असले तरी राष्ट्रीय आणि सागरी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे निशाण ('प्रेसिडेन्टस् कलर') हा केवळ पोलिसांचाच नाही तर संपूर्ण गोवा राज्याचा गौरव आहे, असे सांगतानाच त्यांनी पोलिसांना नवीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. पोलिसांचा आपत्कालीन मदतीचा प्रतिसाद वेळ १९ मिनिटांवरून ८ मिनिटांवर आला असून, तो अधिक गतिमान करून ६ मिनिटांवर आणण्याचे स्पष्ट लक्ष्य पोलिसांनी ठेवले पाहिजे, अशी जबाबदारी शाह यांनी निश्चित केली.

Goa Police Presidents Color Award
Goa Congress: 'पक्षबदलूंना काँग्रेसमध्ये नो एंट्री!' नुवेतील कार्यकर्ते आक्रमक; संभाव्य प्रवेशाला थेट विरोध

गोवा पोलिस दलाच्या प्रदीर्घ, उत्कृष्ट आणि समर्पित सेवेचा गौरव करत केंद्र सरकारतर्फे गोवा पोलिसांना पोलिस दलातील सर्वोच्च मानला जाणारा ‘प्रेसिडेन्टस् कलर’ (राष्ट्रपतींचे निशाण) सन्‍मान भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बहुमान देण्यात आला. हा सर्वोच्च सन्मान पटकावणारे गोवा हे देशातील १५ वे राज्य ठरले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम आणि सिख अशा चारही प्रमुख धर्मांच्या धर्मगुरूं कडून 'प्रेसिडेन्टस् कलर'ची धार्मिक विधीनुसार पूजा करण्यात आली. या सोहळ्याला पोलीस महासंचालक आलोक कुमार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावाडे, मंत्री दिगंबर कामत, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री विश्वजित राणे, विधानसभेचे सभापती गणेश गांवकर, राज्य सचिव सी कांडावेलु आणि इतर आमदार उपस्थित होते. या सोहळ्याची पूर्वतयारी आणि जनजागृतीचा भाग म्हणून संपूर्ण राज्यभरात ''प्राइड ऑफ राइड'' ही विशेष रॅली काढण्यात आली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होता.

शौर्य, सेवेसाठी पोलिस कटिबद्ध

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा गोवा पोलिसांसाठी आणि सर्व गोमंतकीयांसाठी सर्वात मोठा सन्मानाचा क्षण असल्याचे सांगितले. शौर्य, सुरक्षा आणि सेवा हा पोलिसांचा धर्म आहे. अमली पदार्थ विरोधी कारवाई, सागरी सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी यांसारख्या आव्हानांचा सामना करत गोवा पोलीस नेहमीच तत्पर राहिले आहेत, असे ते म्हणाले. २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'पिंक फोर्स'मुळे महिलांच्या सुरक्षेला मोठे बळ मिळाले असून आपत्कालीन संदेश मिळाल्यावर केवळ ७ ते ८ मिनिटांत पोलीस पोहोचतात, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. राज्य सरकार पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय संसाधने पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Police Presidents Color Award
Goa Politics: गाेवा फॉरवर्ड-'आप'मध्ये बोलणी; भाजपला हरविण्‍यासाठी विरोधी पक्षांची 'युती' हेच धोरण

देशाची स्थिर आर्थिक स्थिती : सद्यस्थितीवर आणि विकासावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, जगात आंतरराष्ट्रीय युद्धे सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक गती स्थिर राहिली आहे. २०२६ मध्ये अवघ्या तीन महिन्यांत जीडीपी वाढ ७.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. २०४७ पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात जगभरात सर्वश्रेष्ठ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तपास कार्यात गोवा प्रथम

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पोलिसांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यात गोवा पोलीस देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, प्रत्यक्ष गुन्ह्यांचा तपास लावून ते उघडकीस आणण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कायदा-सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रण, महिला व किनारी सुरक्षा आणि ड्रग्जविरोधी मोहीम या सर्व आघाड्यांवर गोवा पोलीस पूर्ण कटिबद्धतेने आणि व्यावसायिकतेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोवा पोलिसांचे योगदान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, गोवा हे आकाराने लहान असले तरी राष्ट्रीय आणि सागरी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य आहे. राष्ट्रपतींचे निशाण हा केवळ पोलिसांचाच नाही तर संपूर्ण गोवा राज्याचा गौरव आहे. पोलिसांचा आपत्कालीन मदतीचा वेळ १९ मिनिटांवरून ८ मिनिटांवर आला आहे आणि तो ६ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. नवीन कायदे अंमलात आणण्यात गोव्याने देशात ९८.३८% वाढीसह दुसरा क्रमांक मिळवला आहे; आता गोव्याने देशात नंबर १ वर येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच २०२९ च्या 'आंतरराष्ट्रीय खेळ महाकुंभा'साठी पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरू करावी आणि '१९३०' या एआय हेल्पलाइनमध्ये पर्यटकांसाठी सर्व भाषांचा समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Goa Police Presidents Color Award
Goa Forward Party: दोन विधेयकांना मंजुरी देऊ नका! विजय सरदेसाईंचे राज्यपालांना आवाहन; सरकारवर गंभीर आरोप

सायबर सुरक्षेसाठी एआयचा वापर

सायबर फ्रॉड रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. गोवा पोलिसांनी ''१९३०'' हा एआय आधारित हेल्पलाइन क्रमांक जारी करून इतर राज्यांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. गोव्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांच्या सोयीसाठी या एआय यंत्रणेत सर्व भाषांचा समावेश करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com