Goa Congress: 'पक्षबदलूंना काँग्रेसमध्ये नो एंट्री!' नुवेतील कार्यकर्ते आक्रमक; संभाव्य प्रवेशाला थेट विरोध

Nuve Congress Workers; राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेस पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
Nuve Congress Workers
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेस पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात रविवारी (ता.६) नुवे काँग्रेस गट समितीची सल्लागार बैठक पार पडली. यावेळी पक्षबदलू आणि भाजपला जवळ असलेल्या उमेदवारांचा काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारीसाठी विचारही करू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या बैठकीत लिंडन मोन्तेरो आणि फ्रँकी डिमेलो यांच्या संभाव्य पक्षप्रवेशासह उमेदवारीच्या निकषांवरून कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वासमोर स्पष्ट भूमिका मांडत विरोध दर्शवला.या बैठकीला गटाध्यक्ष मॉरिसन रॉड्रिग्स, जिल्हा परिषद सदस्य अँथनी ब्रागांझा, ज्येष्ठ कार्याध्यक्ष एम.के. शेख, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष असिस नोरोन्हा आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासह सुमारे २०० सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

Nuve Congress Workers
Goa Politics: गाेवा फॉरवर्ड-'आप'मध्ये बोलणी; भाजपला हरविण्‍यासाठी विरोधी पक्षांची 'युती' हेच धोरण

नुवेत काँग्रेस उमेदवारीवर निवडून आलेल्या दोन आमदारांनी केलेल्या पक्षांतराच्या घडामोडींनंतरही नुवे मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसवरील विश्वास कायम ठेवला आहे, हा मुद्दा बैठकीत प्रामुख्याने मांडण्यात आला.

कामासह मतदारांचा विश्वास महत्त्वाचा!

आगामी निवडणुकीत तिकीट वाटप करताना तळागाळातील कार्यकर्त्यांचे मत व त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. विशेषतः लिंडन मोन्तेरो व फ्रँकी डिमेलो यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवले.

Nuve Congress Workers
Goa Forward Party: दोन विधेयकांना मंजुरी देऊ नका! विजय सरदेसाईंचे राज्यपालांना आवाहन; सरकारवर गंभीर आरोप

हा आक्षेप वैयक्तिक नसून पक्षासाठी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना व हिताचे रक्षण करण्यासाठी आहे, असे सदस्यांनी यावेळी स्पष्ट केले. उमेदवाराची निवड ही केवळ तळागाळातील काम आणि मतदारांच्या विश्वासावरच आधारित असावी, यावर बैठकीत एकमत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com