डोकं चालवा 50,000 जिंका! AI आणि APP निर्मितीत तुम्ही मास्टर असाल तर गोवा पोलिस घेऊन आलंय मोठी स्पर्धा; लगेच सहभाग नोंदवा

Goa Police Hackathon 2025: रात्र गस्त, ई- बंदोबस्त, लैंगिक हिंसाचार यासारख्या नऊ विषयांना गोवा पोलिसांनी हॅकेथॉनमध्ये प्राधान्य दिले आहे.
Goa Police Hackathon 2025
Goa Police Hackathon 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात पारंगत असलेल्यांसाठी गोवा पोलिसांनी एका मोठ्या स्पर्धेची घोषणा केली आहे. गोवा पोलिसांनी हॅकेथॉन २०२५ च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली असून, या विषयातील तज्ञांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पोलिसांनी एकूण नऊ विषय जाहीर केले असून, प्रत्येक विषयासाठी ५०,००० रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

पोलिसांनी या स्पर्धेसाठी सुरक्षेसंबधित तंत्रज्ञान विकसित करण्यासंबधित विषयांना प्राधान्य दिले आहे. यामध्ये रात्र गस्त, सायबर पेट्रोलिंग, सीसीटीव्ही, लैंगिक हिंसाचार यासारख्या विषयांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय सुचविण्याचे व मोबाईल तयार करण्याचे आव्हान ठेवले आहे. प्रत्येक समस्येवरील उत्तम उपायासाठी पोलिसांकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

Goa Police Hackathon 2025
Goa Coconut Price: गोमंतकीयांना दिलासा! नारळ, भाज्यांचे दर उतरले; 'फलोत्पादन'ने विकले 1 लाख नारळ

इच्छुकांना ११ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Goa Police Hackathon 2025
"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'
3rd Goa Police Hackathon 2025 Topics
3rd Goa Police Hackathon 2025Dainik Gomantak

गोवा पोलिस हॅकेथॉन २०२५ चे विषय

१) नाईट व्हिजिल – स्मार्ट पेट्रोलिंग व्हेरिफिकेशन अप (रात्र गस्तीसाठी)

२) एआय आधारीत डीप फेक व्हिडिओ तपासणीसाठी टूल

३) एआय आधारीत आवाज तपासणी आणि कृत्रिम आवाज तपासणी

४) सायबर पेट्रोलिंग (ऑनलाईन फसवणूक निगडीत गोष्टी पडताळणीसाठी)

५) पोलिस स्थानकाला भेट देणाऱ्यांसाठी मदत करणारे एआय आधारीत टूल

६) ई- बंदोबस्त – बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांचा ट्रॅक ठेवण्यासाठी

७) एआय आधारीत सीसीटीव्ही आणि डिजिटल मिडिया फॉरेन्सिक चाचणी

८) एआय आधारीत पोलिस हेल्पलाईन ११२ ला मदत करणारे टूल

९) लैंगिक अत्याचार व हिंसाचार तपासात मदत करणारे एआय आधारीत गाईड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com