Goa Drugs: आंतरराज्‍य बसमधून ड्रग्‍सची नेपाळ ते गोवा व्हायची तस्करी; गोवा पोलिसांकडून यूपी अधिकाऱ्यांच्‍या साहाय्याने रॅकेटचा पर्दाफाश

Goa Drug Racket Bust: थेट नेपाळमधून गोव्‍यात होणाऱ्या ड्रग्‍स व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Goa Drug Racket Bust
Goa Drug Racket BustDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : थेट नेपाळमधून गोव्‍यात होणाऱ्या ड्रग्‍स व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जहाज, विमानातून अमली पदार्थ आणल्‍याचे आपण ऐकत होतो, परंतु साध्‍या बसमधून अनेक राज्‍ये ओलांडून गोव्‍यात ड्रग्‍स येत असल्‍याचे समोर आले आहे. गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांच्‍या मदतीने या रॅकेटचा सिनेमास्‍टाईलने पर्दाफाश केला.

Goa Drug Racket Bust
Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

मालीम-बेती येथे पकडलेल्या एका पॅडलरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने या टोळीचा म्होरक्या तथा कुख्यात ड्रग्स तस्कर इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिकला बेड्या ठोकल्या. मालीम-बेती परिसरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. अमलीपदार्थ तस्करीची मुळे नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. या संयुक्त मोहिमेत पोलिसांनी बहराइच येथील दर्गा शरीफ परिसरातून इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिक या ड्रग्स माफियाला अटक करण्यात यश मिळविले.

गोवा पोलिसांनी मालीम-बेती येथील मासळी मार्केट परिसरात पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जीवबा दळवी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने बुधवारी (ता. २० मे) पहाटे सापळा रचला होता.

ड्रग्सतस्करी रोखण्यास लोकसहभाग गरजेचा

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या, की अमलीपदार्थ विक्री व्यवहार रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

Goa Drug Racket Bust
Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

आजूबाजूला काय चालले आहे, यावर लोकांनी जागरूकपणे लक्ष ठेवले आणि ती माहिती पोलिसांना दिली तर पोलिसांना तात्काळ कारवाई करता येऊ शकते आणि अशा अमलीपदार्थ विक्री व्यवहाराला आळा घातला जाऊ शकतो, असेही सावंत म्हणाल्या.

कोण आहे मन्ना?

मन्ना मलिक हा २०१२ पासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये तो ‘वसीम उर्फ मिट्टी तेल’ या स्थानिक दलालाच्या संपर्कात आला आणि तेथून त्याने अमली पदार्थांच्या व्यवहाराला सुरुवात केली. त्यानंतर नेपाळमधील ‘अर्जुन’ नावाच्या मुख्य तस्कराशी संधान साधून त्याने हेरॉईनचा थेट पुरवठा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जी माहिती दिली, त्यात तो अमली पदार्थ बहराइचवरून थेट गोव्यात पाठवण्यासाठी तो सामान्य आंतरराज्य ट्रॅव्हल्स बसेसचा वापर करीत होता.

अशा मोठ्या कारवायांमध्ये खात्रीशीर खबर मिळणे महत्त्वाची असते. खबर (टीप) मिळाल्यानंतर कोणतेही वाहन तपासणे शक्य होते. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाला, प्रवाशांना कोणाविषयीही संशय वाटला तर त्याने पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा. - सुनीता सावंत, पोलिस अधीक्षक, अमली पदार्थविरोधी कक्ष.

पहाटेच्‍या अंधारात जाळ्यात अडकला

१पहाटेच्या अंधारात दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अर्जुन बिश्वकर्मा (वय ३६ वर्षे) आणि चेतकांत ओली (वय २५ वर्षे) या दोन नेपाळी नागरिकांना थांबवून त्यांची झडती घेतली. त्यात त्यांच्याकडे ७.९७ लाख रुपये किमतीचे ३९.८८ ग्रॅम उच्च दर्जाचे हेरॉईन सापडले.

Goa Drug Racket Bust
Hyderabad Drugs Case: हैदराबादमध्‍ये 'ड्रग्‍स पार्टी' आयोजनात गोवा कनेक्‍शन उघड! डीजे क्लिंटनवर संशय; 12 जणांना अटक

पोलिसांनी हेरॉईन, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण ८.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेने या दोन्ही नेपाळी युवकांची कसून चौकशी केल्यानंतर या आंतरराज्य सिंडिकेटचा खुलासा झाला.

गोव्यात पोहोचणाऱ्या या हेरॉईनचा मुख्य पुरवठादार हा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिक असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’शी संपर्क साधून मदत मागितली.

५ ३० मे रोजी गोवा गुन्हा शाखेचे निरीक्षक महेश गडेकर आणि उपनिरीक्षक माधव नाईक यांच्या संयुक्त पथकाने दुपारी कारवाई करीत बहराइचच्या मन्सूरगंज भागातून मन्ना मलिकला ताब्यात घेतले आणि रविवारी त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले.

‘यूपी एसटीएफ’चे पोलिस उपअधीक्षक प्रमेश कुमार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील उपनिरीक्षक चंद्रप्रकाश मिश्रा आणि त्यांच्या पथकाने पाळत ठेवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com