

पणजी: हैदराबादमध्ये गोव्यातून अमलीपदार्थ पुरवले जात असल्याचे आधीच उघड झाले होते. आता ड्रग्स पार्टीच्या आयोजनातही गोमंतकीयांचा सहभाग असल्याचे धागेदोरे हैदराबाद पोलिसांच्या हाती लागले आहेत. यापूर्वी अमलीपदार्थ व्यवहार प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीतून तपासाचा विस्तार करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर गोव्यातील काही घटक ड्रग्सपुरवठा आणि पार्टी आयोजनाशी संबंधित असल्याचा संशय बळावला आहे. मोईनाबाद (हैदराबादजवळ) येथील ‘फार्महाऊस ड्रग्स पार्टी’ प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने गोव्यातील ‘क्लिंटन’ नावाच्या डीजेचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.
त्याच्यावर ड्रग्सपुरवठ्याचा संशय असून, त्यानेच एमडीएमए उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जुबिली हिल्स येथील डॉक्टर कोला बालाजी पटेल यांना क्लिंटनकडून एमडीएमए मिळत होते. याच साखळीमार्फत माजी आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्या फार्महाऊसवर अमलीपदार्थ पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही रेड्डी व त्यांच्या मित्रांनी अशा पदार्थांचे सेवन केल्याचे तपासात आढळले आहे.
या प्रकरणात संशयितांची संख्या १६ वर पोहोचली असून, आत्तापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. राकेश वर्मा आणि अभिषेक सिंग हे फरार आहेत. मुख्य आरोपी रोहित रेड्डी, त्याचा भाऊ रितेश रेड्डी आणि नमित शर्मा सध्या चंचलगुडा कारागृहात आहेत.
१४ मार्च रोजी झालेल्या फार्महाऊस पार्टीत दोन प्रकारचे ड्रग्स वापरण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. छाप्यावेळी सहाजणांनी ड्रग्सचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. रोहित रेड्डी, रितेश रेड्डी, कौशिक रवी आणि अर्जुन रेड्डी यांच्या शरीरात कोकेन, नमित शर्मा याच्या शरीरात ॲम्फेटामाईन, मेथॲम्फेटामाईन आणि कोकेन तर टीडीपीचे खासदार पुट्टा महेश कुमार यांच्या शरीरात ॲम्फेटामाईन आणि मेथॲम्फेटामाईन आढळले.
१ गोव्यातील डीजे क्लिंटनवर संशय
२ ‘एमडीएमए’ पुरवठ्याचा आरोप
३ हैदराबाद पोलिसांचे पथक गोव्यात
४ अटकेबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.