Drug Case: गोव्यातील अमलीपदार्थ प्रकरणातील फरारी संशयित राजस्थानात सापडला! पेडणे पोलिसांची पुष्करमध्ये कारवाई; 9 दिवसांची कोठडी

Goa Police: ८ ऑगस्ट रोजी माईण - कोरगाव येथील घर क्रमांक ३२०/ए मधील भाड्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला होता.
Goa Police
Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: माईण - कोरगाव येथे भाड्याच्या खोलीत अमलीपदार्थांचा साठा आढळलेल्या प्रकरणातील फरार संशयित दिव्यांश वत्स (वय ३६, रा. उधमपूर, जम्मू-काश्मीर) याला पेडणे पोलिसांनी राजस्थानातील पुष्कर येथून अटक केली.

तांत्रिक पाळत ठेवून पेडणे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील आरोपीला गोव्यात आणून पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी नऊ दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Goa Police
Goa Deendayal Scheme: गोवा सरकारचा मोठा निर्णय! दीनदयाळ योजनेत आता दरमहा 500 रुपये जास्त; मोटारसायकल पायलट, तृतीयपंथीयांनाही लाभ

८ ऑगस्ट रोजी माईण - कोरगाव येथील घर क्रमांक ३२०/ए मधील भाड्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत आरोन मनोज गोम्स (वय ४१) आणि जकारिया मोहम्मद इशाक (वय ३५) यांना अमलीपदार्थांच्या साठ्यासह रंगेहात पकडण्यात आले होते.

त्यांच्याकडून १२९ एलएसडी पेपर क्यूब्स (३.१३ ग्रॅम), ८८.५५ ग्रॅम चरस, १.०७ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि ३.५९ ग्रॅम केटामाइन पावडर असा एकूण सुमारे ७ लाख ६५ हजार ६०० रुपये किमतीचा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला होता. चौकशीदरम्यान झकारिया याने हा अमलीपदार्थांचा साठा जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील दिव्यांश वत्स याच्याकडून मिळाल्याची माहिती दिली होती, पण तो फरार होता.

Goa Police
Goa Smart Meter: '15 दिवसांत स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या', अमित पाटकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

पेडणे पोलिसांच्या शोध मोहिमेला यश

तांत्रिक तपासाच्या आधारे पेडणे पोलिसांनी विशेष पथक तयार करून राजस्थानमधील पुष्कर येथे शोध मोहीम राबवली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक आदित्य गाड, पोलिस कॉन्स्टेबल रजत गावडे व शांताराम महाले यांचा या विशेष पथकात समावेश होता. या पथकाने पुष्कर येथील पार्क हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या दिव्यांश वत्स याला काल अटक केली. या प्रकरणी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता उपविभागीय पोलिस अधिकारी आशिष शिरोडकर व पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य गाड हे पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.