Goa Crime News: ड्रग्जविरोधात कारवाया वाढल्या; गोवा पोलिस ॲक्शन मोडवर

Goa: शहरी आणि ग्रामीण भागात जिल्हा क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने धडक मोहीम सुरु केली आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्यात हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी गोवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्थानिकांना अटक करण्यास सुरवात केली होती. त्यानंतर आता राज्य पोलिस अधिक सक्रिय झाले आहेत. किनारपट्टी तसेच शहरी व ग्रामीण भागात जिल्हा, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी पथकाने धडक मोहीम सुरू केली आहे. एरवी आठवड्यातून कधी एक गुन्हा नोंद होत होता, त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी एक व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल होत आहेत.

ड्रग्ज तस्करीच्या कारवाईत गोवा पोलिस मागे पडत असल्याचे चित्र हैदराबाद पोलिसांनी दाखवून दिल्याने त्यांची प्रतिमा खालावली होती. ही प्रतिमा उंचावण्यासाठी गोवा पोलिसांनी ड्रग्ज विक्रेते व तस्करीमधील स्थानिकांचा शोध सुरू केला आहे.

Goa Police
Drug peddler : अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्री प्रकरणी कर्नाटकातील एकाला अटक

गुप्तचर यंत्रणाही अधिक सक्षम करत दरदिवशी छापेमारी सुरू केली आहे. गेल्या 15 दिवसांत गोवा पोलिसांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्जप्रकरणी गुन्हे दाखल करून 17 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये गोव्यातील स्थानिकांचाही समावेश आहे.

या कारवाईत जवळपास 1 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. हैदराबाद पोलिस गोव्यात डेरा घालून बसल्याने काही ड्रग्ज विक्रेते त्यांची नावे यादीमध्ये असेल म्हणून भीतीने भूमिगत झाले होते. मात्र, ते गोव्यातून गेल्यावर या विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

Goa Police
Goa Tourist Places संरक्षण & देखभाल कायदा सुधारणा; कारावासाची तरतूद रद्द, दंडाची रक्कम वाढवली

बंद क्लबच्या परिसरात विक्री

‘कर्लिस’ व ‘हिलटॉप’ क्लब यामध्ये रात्रभर संगीतरजनी पार्ट्यांना पर्यटकांची गर्दी होत असल्याने हे विक्रेते त्या परिसरात फेऱ्या मारत असायचे. आता हे क्लबच बंद झाल्याने हे विक्रेते क्लबच्या परिसरात अथवा विविध ठिकाणी विक्री करत आहेत. त्यामुळे गोवा पोलिसानी त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.

ड्रग्स व्यवहारात आफ्रिकनचा सहभाग: राज्यात ड्रग्स व्यवहारात बहुतेक आफ्रिकन खंड देशांतील संशयित अधिकतर गुंतलेले दिसतात. ड्रग्स विरोधी गुन्ह्यांतून हा आकडा दिसून येत असल्याची माहिती पर्वरीचे पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. कांदोळीत एका कार्यक्रमात ते म्हणाले, आफ्रिकन खंडातील नागरिकांचा या ड्रग्स व्यवहारात अधिक सहभाग आहे. याशिवाय या पर्यटकांवर वेळोवेळी राज्यात अवैद्यरित्या वास्तव्य केल्याचे गुन्हे सुद्धा नोंदविले जातात.

Goa Police
Margao: मुलांना पळविणारी टोळी ही केवळ अफवा; पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया

अमली पदार्थप्रकरणी तिघांना अटक

सायपे-कांदोळी येथील हिल्टन हॉटेलजवळ क्राईम ब्रँच पथकाने छापा टाकून सिग्मंड तेलीस (21, कांदोळी) व अक्षय बाणावलीकर (26, कळंगुट) यांना आज पहाटे तीन वाजता अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची 5 ग्रॅम एमडीएमएम पावडर, दोन मोबाईल्स व स्कुटरही जप्त केली. त्यानंतर रात्री उशिरा अमलीपदार्थविरोधी पथकाने उत्तर गोव्यात कारवाई करत एका विदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन अमलीपदार्थ जप्त केले.

ड्रग्जचा ओव्हरडोस; दोघांवर गुन्हा

म्हापसा: ड्रग्जप्रकरणी आंध्र प्रदेशमधील युवकासह त्याला कोकेन पुरवणाऱ्या टॅक्सी चालकाविरोधात कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. संशयित देवीनेनी चौधरी व त्याचे तीन मित्र 20 सप्टेंबरला गोव्यात आले होते. यावेळी स्वीफ्ट डिझायर पर्यटक टॅक्सी कारचालकाने त्यांना एक ग्रॅम कोकेन पुरविले. मात्र, ओव्हरडोस झाल्याने चौधरीला गोमेकॉत दाखल करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या जबानीत त्याने सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर सादर केलेल्या अहवालानूसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com